आद. लहुजी कांबळे यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या मार्फत मानले आभार...
=======================
=======================
सांगली वार्ताहर : दि. १३ जानेवारी २०२४
डॉ.बाबासाहेबआंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्था तसेच आंबेडकरी चळवळीला आपले योगदान म्हणून आपल्या स्वकष्टातून उभा केलेला बंगला आद. डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाचा स्वीकार करून राजगृहाचे पाईक म्हणून अधिकृतरीत्या दान स्वरूपात दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणारा समाज उदात्त उंतकरणाने समाजहितासाठी तथागतांची दान पारमिता अंगीकारून एक आदर्श समाजाची ओळख निर्माण करत आहे. हे आंबेडकरी चळवळीचे यश आहे. तथागतांचा धम्म सर्व जंम्बूदिपात पोहचला आणि टिकून राहिला तो दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे हा इतिहास आहे.
आधुनिक दानशूर अनाथपिंडक व्यक्तीमत्त्व आद. लहुजी तथा एल. डी.कांबळे साहेब यांचा बंगला दान देण्याचा संकल्प गेल्या दोन ते तीन वर्षापासून झाला होता. त्यांनी स्वतः आद भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांची भेट घेऊन माझा बंगला मी तुम्हाला स्वच्छेने दान करू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील सांगली जिल्हा हा क्रांतिवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुपवाड शहरात सांगली जिल्ह्यात वास्तव्यास असणारे आद. लहुजी कांबळे साहेब यांच्या मालकीचा बंगला माळशिरस तालुक्यातील 'अकलूज' या ठिकाणी असून हा बंगला त्यांनी दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी,आद. डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या नांवे कायदेशीर रित्या हस्तांतरित करण्यात आलेला आहे.
डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांना दिलेला बंगला समाज उपयोगी कार्यास वापरण्यात येणार असून. त्या ठिकाणी अभ्यासिका, ग्रंथालय, गरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी निवासी लाभ मिळावा यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सुचना डॉ भिमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
आधुनिक दानशूर अनाथपिंडक व्यक्तीमत्त्व आद. लहुजी तथा एल. डी.कांबळे साहेब यांनी आपल्या बंगला दान देऊन आंबेडकरी चळवळीला मोठे योगदान दिले आहे त्याबद्दल त्यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या कुपवाड शहरातील राहते घरी जाऊन मनःपूर्वक आभार मानले, यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, तसेच जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख ऋषीकेश माने, याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सांगली दक्षिण जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, महानगरपालिका अध्यक्ष आनंदसागर पुजारी, मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, जिल्हा संघटक नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆