BANNER

The Janshakti News

शालेय विद्यार्थ्यांचा भोगी बाजार


=====================================
=====================================

तासगाव/तुरची (ता.१३) : मकर संक्राती व आमदार डॉ.विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसा निमित्त तुरची ता.तासगाव येथील भारती विद्यापीठ बाल विकास मंदिर व प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांच्या भोगी बाजाराचे आयोजन केले होते.
  
   आज १३ जानेवारी रोजी भारती‌‌ विद्यापीठाचे कार्यवाह माजी मंत्री तथा पलूस-कडेगाव विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.डॉ. विश्वजित ऊर्फ बाळासाहेब कदम यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.



 आमदार डॉ. विश्वजित कदम यांचा वाढदिवस आणि मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या भोगी बाजाराचे आयोजन तुरची फाटा चौकात करण्यात आले होते.

  शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश होता. 

   या भोगी बाजारात विद्यार्थांनी हजारो रुपयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फरसाण, किराणा सामान स्टेशनरी, कटलरी आदी वस्तूंची दुकाने थाटली होती. 



  या भोगी बाजाराला तुरची गावचे सरपंच विकास डावरे , येळावी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय जाधव यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी खरेदी-विक्री व आर्थिक देवाणघेवाण विषयी संवाद साधत विद्यार्थ्यांच्याकडून भाजी व इतर वस्तू खरेदी केल्या आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केलेच तर सरपंच डावरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ दिला त्यावेळी विद्यार्थ्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते.
   
    विद्यार्थ्यांच्या भोगी बाजारातून भाजी खरेदी करण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. 

  यावेळी भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.नेहा कोल्हापूरे व प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री विलास मोरे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा --







◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆