BANNER

The Janshakti News

माळवाडीत सर्वरोग तपासणी व निदान शिबीर संपन्न


=====================================
=====================================

भिलवडी वार्ताहर :      दि. १३ जानेवारी २०२४

स्व. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या जयंतीनिमित्त व आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माळवाडी ता.पलूस येथे घेण्यात आलेले मोफत सर्वरोग तपासणी व निदान शिबीर शुक्रवार  दि.१२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० या वेळेत पार पडले.

शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आले होते.
भारती विद्यापीठ वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय सांगली व भारती विद्यापीठ जन वैद्यक शास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने हे शिबीर घेण्यात आले होते.
  
सदर शिबिरास तज्ञ डॉ. गिरीश धुमाळे , डॉ.संजय कुरेशी , डॉ.हेमराज सातपुते , डॉ.अभिजित कदम , डॉ.अर्चना पवार, डॉ. नितीन बागणे , यांच्या सह आदि डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते. 
 
या शिबिरासाठी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सद्स्य संजय काटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

सदर शिबिरामध्ये तब्बल ४३३ रुग्णांनी मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतला. यावेळी रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली.


स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या व राज्याचे सहकार व कृषी राज्य मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सांगली येथील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने नेहमीच गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते. गरजू रुग्णांची भारती हाँस्पिटल , सांगली येथे सवलतीच्या दरात विशेष तपासणी, शस्त्रक्रिया केली जाते. योजनेमध्ये बसणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार केले जातात तरी गरजू रुग्णांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन यावेळी भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व भारती विद्यापीठ रग्णालय, सांगली यांचे वतीने करण्यात आले.
 
 
 दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते स्व. डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
 रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, पलूस-कडेगाव तालुक्याचे काँग्रेसचे नेते महिंद्र आप्पा लाड यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरैय्या तांबोळी , उपसरपंच विशाल नलवडे , माजी उपसरपंच व विद्यमान सद्श्य संजय काटकर , माणिक (तात्या) माने , संताजी जाधव यांच्या सह ग्रामपंचायतीचे सद्श्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

हेही पहा ---
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆