=====================================
=====================================
नांदेड (ता.१७) : अपघातात मृत्यू झालेले आष्टा ता. माहूर जिल्हा नांदेड येथील पत्रकार तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले कै. भिमराव पुनवटकर यांचे नुकतेच अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवार दि.१६ जानेवारी रोजी भेट घेतली.
यावेळी आठवले यांच्या हस्ते पुनवटकर यांच्या पत्नीकडे १ लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक विजय सोनावणे, नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे, दिगंबर वाघमारे, महिंद्रा मानकर दिग्रस, समाज कल्याण विस्तार अधिकारी मोरे, समाजकल्याण अधिकारी दवणे, बाबाराव केशवे, केशव भगत, प्रकाश गायकवाड, दीपक कांबळे, रवींद्र गायकवाड, रफिकभाई गाईड, अमोल गायकवाड, दत्ता कांबळे, धनिक शेंडे, विजय खरे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆