BANNER

The Janshakti News

हे ४ पदार्थ आहेत सायलेंट किलर! खाताना चविष्ट वाटतात, पण खाणार तो पस्तावणार...



=====================================
=====================================


आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आतडे निरोगी आणि मजबूत ठेवणे आवश्यक आहे. आपण जे काही खातो - पितो ते आतड्यांमधून जाते. आतड्यांचे काम अन्नापासून पोषण वेगळे करणे, व हे पोषण शरीराच्या इतर भागापर्यंत पोहचवणे, यासह शरीरातील घाण बाहेर काढणे हे आहे. आतड्यांच्या कामावर परिणाम झाला तर, साहजिक पचनसंस्था बिघडू शकते. ज्यामुळे शरीरात गंभीर आजार उद्भवतात. आतड्यांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. काही पदार्थ चांगले बॅक्टेरिया मारतात, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

कधीकधी चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आतड्यांवर गंभीर परिणाम होते. आतड्यांना झालेल्या नुकसानीमुळे बद्धकोष्ठता, क्रोहन रोग, कोलायटिस, कर्करोग यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. याबाबतीत पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी आतड्यांसाठी कोणते पदार्थ घातक ठरतात याची माहिती दिली आहे.



साखर...

पदार्थात गोडवा वाढवण्यासाठी साखर आवश्यक आहे. पण हीच साखर आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरत आहे. तज्ज्ञांचे मते, साखरेचे अतिसेवन केल्याने आतड्यांमधील निरोगी जीवाणू नष्ट होतात, ज्यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते. साखरेचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने कॅलरीज देखील वाढते.



आर्टिफिशियल स्वीटनर...

आर्टिफिशियल पदार्थ पचण्यास जड जातात. कृत्रिम स्वीटनर खाल्ल्याने आतड्यांमध्ये हानिकारक बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे शरीरात इतर रोगांची संख्या वाढू शकते. कृत्रिम स्वीटनर्स इम्यून रेस्पोंस वाढवतात, ज्यामुळे जळजळ होऊ शकते.



अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड...

मीठ, फॅट्स आणि साखर अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या लिस्टमध्ये येतात. ज्यात मैदाचा देखील समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थाचे अति प्रमाणात सेवन केल्याने, आतड्यातील मायक्रोबायोटा बदलू शकते. ज्यामुळे खाल्लेले पदार्थ पचण्यास अवघड जाते.



फ्राइड फूड्स...

नव्या पिढीला तळलेले पदार्थ प्रचंड आवडतात, पण प्रमाणाच्या बाहेर हे पदार्थ खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. जर आपण तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खात असाल तर, आतडे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनस्पती तेलांमध्ये ओमेगा -6 पेक्षा ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आतड्यांवरील लाइनिंगचे नुकसान होऊ शकते.

संकलन - 
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆