BANNER

The Janshakti News

कुंडल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावरती अर्जुन लालासो कुंभार यांची बिनविरोध निवड
=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर                    २२ नोव्हेंबर २०२४

कुंडल ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावरती अर्जुन लालासो कुंभार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संभाजी पटकुरे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचे आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांनी अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कुंडल ग्रामपंचायतीची निवडणूक अटीतटीची झाली होती यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 14 सदस्य आणि सरपंच निवडून आणत एकहाती सत्ता स्थापन केली. तर काँग्रेसचे 3 सदस्य निवडून आले होते. यांनुसार ग्रामपंचायतीत सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड यांनी सुचवलेल्या नावावर एकमताने निर्णय घेणेत आला. आणि अर्जुन कुंभार यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, गावाला क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचारांचा वारसा आहे तो आपण सर्वांनी पुढे न्ह्याव. सर्व गट तट बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायत ही सामान्य नागरिकांचे हक्काचे ठिकाण आहे यासाठी सर्वांनी विकास कामांना प्राधान्य द्यावे. पद हे कामासाठी आहे कामातून गावाचे नांव देशपातळीवर न्ह्या. महिला सदस्यांनी बचत गट तयार करा यातून गाव पातळीवर उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारपेठ तयार करा. गावच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य पातळीवरील पुरस्कारासाठी सतत जनतेत कार्यरत राहण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

यावेळी सरपंच जयराज होवाळ, माजी उपसरपंच राजेंद्र लाड, अनिल लाड, कुंडलिक एडके, जगन्नाथ आवटे, राजेंद्र मदने, मनोज पवार, प्रदीप लाड, महारुद्र जंगम, माजी सरपंच प्रमिला पुजारी, माजी उपसरपंच माणिक पवार, माजी सभापती अरुण पवार, निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी पटकुरे यांनी काम पाहिले.


उपसरपंच पदी अर्जुन कुंभार यांची निवड झाल्यावर त्यांचा सत्कार आमदार अरुणअण्णा लाड, किरण लाड यांच्याहस्ते सत्कार करणेत आला.

  हे पण पहा ------

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆