BANNER

The Janshakti News

बांधकाम कामगार 'बाळासो दावल धडके' यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या बांधकाम कॉन्ट्रॅक्टर तसेच घर मालक यांच्यावर कामगार न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करून मयत बांधकाम कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळवून द्या....

    संजय कांबळे
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांची मागणी...


=====================================
=====================================

सांगली : वार्ताहर                     24 Nov 2024


 सांगली : बांधकाम कामगार 'बाळासो दावल धडके' यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे संबंधित बांधकाम कॉन्ट्रॅक्टर   तसेच घर मालक यांच्यावर कामगार न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करून मयत बांधकाम कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळवून द्यावेत. त्याचबरोबर महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या मार्फत मयत बांधकाम कामगारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यासाठी विविध कल्याणकारी योजनेंचे लाभ देण्यात यावेत असे लेखी निवेदनाद्वारे सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना देण्यात आले आहे. त्यांनी निवेदन पत्रात असे म्हटले आहे की, आपल्या कार्यक्षेत्रातील सांगली जिल्ह्यामध्ये मिरज शहरात राहत असणारे बांधकाम कामगार बाळासाहेब दावल धडके रा. म्हाडा कॉलनी ईमारत क्र.७ रूम नंबर २१७, डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मागे, मिरज. हे गेले दोन वर्षांपूर्वी पासून मिरज तालुक्यातील तानंग येथील संबंधित बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडे कामासाठी जात होते. दि.१६/१०/२०२३ रोजी पासून, नागराळे, ता. पलुस येथील संबंधित घर मालकाच्या घराचे बांधकाम काम करण्यासाठी 'नागराळे' या गावी मुक्काम राहुन घर बांधून देण्याचे काम करीत होते. दि. २३/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे बांधकाम कामगार बाळासो दावल धडके हे काम करीत असताना, घराच्या बांधकामा जवळून, एम.एस.इ.बी. वितरण विभागाची मुख्य विद्युत वाहिका तारेचा ११ के व्ही हाय पावर शॉक लागून ते तिथेच कोसळले. त्यामुळे ते जाग्यावरच मृत्यूमुखी पडले. औपचारिक म्हणून त्यांना, बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि घर मालकाने पलुस मधील "राहुल हॉस्पिटल" या खाजगी हॉस्पिटलमध्ये आणले, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून बांधकाम कामगार बाळासो दावल धडके हे मयत झालेले आहेत असे घोषित केले. या प्रकरणी पोलीसांनी पंचनामा करुन पलुस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यांबरोबरच बांधकाम कामगार यांची पत्नी ललिता बाळासो धडके यांनी बांधकाम कॉन्टॅक्टर तसेच घर मालक यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा पलुस पोलीस निरीक्षक सो यांच्याकडे दाखल केला आहे. यामुळे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने धडके कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पैशाने भरुन न येणारे असे मोठे नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता बांधकाम कॉन्टॅक्टर यांनी बांधकाम कामगारांना काम करते वेळी कामगारांच्या जीवितत्वचा व सुरक्षेचा विचार करून सुरक्षा साहित्य देणे आवश्यक व बंधनकारक आहे. तसेच घर मालक आणि बांधकाम कॉन्टॅक्टर यांना सुरू असलेल्या बांधकामा जवळ एम.एस.इ.बी. वितरण विभागाची मुख्य विद्युत वाहिका ११ के व्ही  हाय पावर विद्युत तारा आहेत हे माहीत असूनही बांधकाम कामगार बाळासो दावल धडके यांना धोकादायक काम हे कोणतेही सुरक्षा साहित्य न देता काम करण्यासाठी भाग पाडले आहे. बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि घर मालक यांच्या बेजबाबदार निष्काळजीपणा मुळेच एक श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 

बांधकाम कॉन्ट्रॅक्टर तसेच घर मालक यांना जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कामगार न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करून, बांधकाम काम करीत असताना मृत्यूमुखी पडलेले कामगार बाळासो दावल धडके यांच्या वारस पत्नीला कुटुंबाची पुढील जबाबदारी तसेच मुलींचं शिक्षण त्याचबरोबर मुलींच्या लग्नाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून '50 लाख' रुपये हे बांधकाम बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आणि घर मालक यांच्या कडून मिळवून द्यावेत.

 संबंधित घर मालक यांचे नविन घराचे बांधकाम हे कोणतेही सुरक्षा साधने न पुरवता 'नागराळे' या गावी सुरू आहे. तरी परत भविष्यात अशी गंभीर घटना घडू नये म्हणून आपण आपल्या कार्यालयातील अधिकारी यांना सदर कामाच्या ठिकाणी ताबडतोब जाऊन, कॉन्ट्रॅक्टर व मालक यांच्या वर नियमानुसार कायदेशीर धोरणानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशी गंभीर घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

असे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शिष्टमंडळाने मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांना प्रत्यक्षात भेटून निवेदनाद्वारे विनंती केली आहे. 
यावेळी, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे , जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, नितीन चव्हाण, जगदिश कांबळे, शिवाजी त्रिमुखे , यांच्या बरोबरच मयत बांधकाम कामगार यांच्या पत्नी ललिता धडके, मुलगी इंदूबाई धडके, हिरा धडके, विक्रांत गायकवाड, हिरामण भगत, बंदेनवाज राजरतन, इसाक सुतार, जावेद आलासे, सिध्दार्थ कांबळे इत्यादी उपस्थित होते.

हे पण पहा -----◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆