BANNER

The Janshakti News

उद्योजक गिरीश चितळे यांची भिलवडी शिक्षण संस्थेस दोन लाख एकावन्न हजाराची देणगी




======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                     दि. २४ नोव्हेंबर २०२३

भिलवडी (ता. पलूस) : मे.बी.जी.चितळे डेअरीचे संचालक,प्रसिद्ध उद्योगपती 
गिरीश चितळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संस्थेला दोन लाख एकावन्न रुपये देणगी दिली. 
आपला वाढदिवस साजरा न करता 
भिलवडी शिक्षण संस्थेस प्रतिवर्षी देणगी देण्याची परंपरा स्वर्गिय उद्योगपती काकासाहेब चितळे यांनी निर्माण केली.त्यांचे पश्चात चितळे परिवारतील सदस्य आपल्या वाढदिनी भिलवडी शिक्षण संस्थेस विविध विकास कामासाठी भरभरून देणगी देत आहे. गिरीश चितळे यांच्या सहकार्यातून शिक्षण संस्थेच्या सर्व विभागामध्ये पंच्याऐंशी हजार रुपये किंमतीचे सौर ऊर्जेवरील बल्ब बसवण्यात आले आहेत.गिरीश चितळे यांनी देणगीचा धनादेश  संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे यांच्याकडे सुपूर्द केला.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी आपल्या मनोगतातून देणगी बद्दल संस्थेच्या वतीने गिरीश चितळे यांचे ऋण व्यक्त केले.संस्था पदाधिकाऱ्यांनी बुके देऊन गिरीश चितळे यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक  जयंत केळकर, सचिव मानसिंग हाके, सहसचिव के. डी. पाटील, प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे,मुख्याध्यापक संजय मोरे,सुकुमार किणीकर, तुषार पवार,विभागप्रमुख प्रा. सौ.मनीषा पाटील,विद्या टोणपे, स्मिता माने आदी  उपस्थित होते.



 गिरीश चितळे यांनी देणगीचा धनादेश डॉ.बाळासाहेब चोपडे यांच्याकडे सुपूर्द केला.शेजारी मानसिंग हाके,जयंत केळकर, डॉ. दिपक देशपांडे,संजय मोरे आदी.

हे पण पहा ----

बिबट्या आणि मानवी संघर्ष ; बिबट्या पासून बचाव कसा करावा



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆