BANNER

The Janshakti News

प्रा. संजय यादव यांची संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्य पदी निवड=====================================
=====================================

भिलवडी : प्रतिनिधी दि. २२ नोव्हेंबर २०२३

सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश (भाऊ) खाडे यांच्या शिफारशीनुसार व माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम (भाऊ) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीत पलूस तालुक्यातील शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा अशासकीय प्रतिनिधी सदस्य पदी प्राध्यापक संजय सुबराव यादव रा.सुखवाडी ता.पलूस यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या वतीने करण्यात आली आहे.


प्रा.संजय यादव हे सन्मान शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व सन्मान मल्टीस्टेट को-ऑफ दुध संघाचे संस्थापक चेअरमन व सांगली जिल्हा शिक्षण संस्था महासंघाचे विद्यमान संचालक आहेत.

माळवाडी (ता.पलूस) येथे प्राथमिक शाळा , माध्यमिक शाळा ,ज्युनिअर कॉलेज व सन्मान करिअर अकॅडमी यासह वसगडे , नांद्रे , पलूस , नागठाणे या ठिकाणी सन्मान शिक्षण संस्थेच्या शाळा कार्यरत आहेत.
सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस , राष्ट्रवादी काँग्रेस पलूस तालुका सरचिटणीस , राष्ट्रवादी काँग्रेस पलूस तालुका उपाध्यक्ष , सल्लागार हुतात्मा सह. बँक लि.वाळवा अशी त्यांनी विविध पदे भूषवली आहेत त्यांचा विविध शैक्षणिक , सांस्कृतिक व सामाजिक कामात सहभाग असतो.

हे पण पहा ----

बिबट्याचा भिलवडी शिवारात शेतकऱ्यावर हल्ला..

बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा...अन्यथा रास्तारोको          धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी 
          पलूस तालुक्यातील धनगर समाजाचा 
          पलूस तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆