BANNER

The Janshakti News

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्‍या जयंती निमित्‍त दि. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर रोजी व्‍याख्‍यानमालेचे आयोजन



======================================
======================================

कुंडल : वार्ताहर                     दि. 27 नोव्हेंबर 2023

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांच्‍या जयंती निमित्‍त दि. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर रोजी व्‍याख्‍यानमालेचे आयोजन करणेत आले आहे. हि व्‍याख्‍यानमाला कुंडल (ता.पलूस) येथील ग्रामपंचायतीच्‍या समोरील पटांगणावर संध्‍याकाळी 6 वाजता आयोजित केली आहे. अशी माहिती क्रांतिअग्रणी विचार व कार्यशक्तीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते.

या व्‍याख्‍यानमालेत पहिले पुष्‍प गुंफणेसाठी शुक्रवार दि. 1 डिसेंबर रोजी प्रसिद्ध लेखक मधुकर भावे यांचे '' स्वातंत्र्यलढा आणि त्यानंतरच महाराष्ट्र'' या विषयावर व्‍याख्‍यान होणार आहे. दुसरे पुष्‍प गुंफण्‍यासाठी शनिवार (दि.2) रोजी विश्वंभर चौधरी यांचे '' निर्भय बनो भारत '' या विषयावर व्‍याख्‍यान होणार आहे तर तिसरे पुष्‍प गुंफण्‍यासाठी रविवार (दि.3) रोजी ऍड.वैशाली डोळस यांचे '' भारतातील स्त्रिया '' या विषयावर व्‍याख्‍यान होणार आहे. आणि सोमवार (दि.4) रोजी क्रांतिअग्रणी पुरस्‍कार प्रदान सोहळा होणार आहे. दि. 4 रोजी सकाळी क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्‍या क्रांती सहकारी साखर कारखाना कार्यस्‍थळावरील समाधीस अभिवादन करण्‍यात येणार आहे. तरी या व्‍याख्‍यान मालेसाठी आणि अभिवादानासाठी परिसरातून मोठ्या संख्‍येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन क्रांतिअग्रणी विचार व कार्यशक्ती, क्रांती उद्योग समुह यांचे वतीने करणेत आले आहे.

यावेळी अशोक पवार, कुंडलिक एडके, अनिल लाड, श्रीकांत लाड, डॉ प्रताप लाड, मुकुंद जोशी, कॉ. शहाजी पवार यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆