BANNER

The Janshakti News

क्रांतीचा नवीन उपक्रम.. पुढच्या वर्षी निडव्याला मिळणार १०० रु जादा दर.



=====================================

=====================================

कुंडल : वार्ताहर                    दि. २९ नोव्हेंबर २०२३

यंदा म्हणजे गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये ऊसाचे खोडवा पिक गाळपास आल्यानंतर, निडवा ठेवणा-या शेतक-यांना अंतिम दरापेक्षा प्रती टनास १०० रु.जादा अनुदान देण्याचे धोरण क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरूणअण्णा लाड यांनी आज जाहिर केले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष दिगंबर पाटील प्रमुख उपस्थित होते.



आमदार लाड म्हणाले, ऊस हे गवतवर्गीय पिक आहे. एकापेक्षा जास्त खोडवा पिके घेण्यासाठी फुटवे देणेची खोडवा पिकाइतकेच उत्पादन देणेची निडवा पिकाची नैसर्गिक क्षमता असते. प्रगत देशांमध्ये ऊसाची ४/५ खोडवा पिके घेतली जातात. आपल्या परिसरातील शेतकरी खोडवा गाळपास गेलेनंतर, ऊसपिक काढून नविन लागण करतात. नविन लागण करणेसाठी पुर्वमशागत, बियाणे, लागण खर्च, बेसल डोस तसेच इतर खर्चासाठी एकरी सुमारे ३० हजार रूपये खर्च येतो म्हणजे नविन लागण पिकाच्या उत्पादनातील सुमारे १० ते १२ टनाचे पैसे सुरवातीलाच खर्च होतात. यंदा सुरवातीपासूनच १५ टक्के खोडवा गाळपासाठी तोडला जात आहे. त्यामुळे कारखान्याच्या ऊसविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली पाचट आच्छादन, बुडखे तासणे, सांधमोड करणे इ. उत्तम व्यवस्थापन केलेस, कमी खर्चात निडवा पिकाचे शाश्वत उत्पादन घेणेस मदत होणार आहे. यंदा ज्या शेतक-यांचे एकरी खोडवा उत्पादन ४० मे.टनापेक्षा जास्त येईल त्या शेतक-यांनी ऊसाचा निडवा ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आणि अशा शेतक-यांना निडवा पिक घेण्यासाठी कारखान्याच्या खोडवा व्यवस्थापनातील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत त्यासाठी फक्त आपण निडवा पीक ठेवल्याची माहिती कारखान्याकडे लेखी अर्ज करून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी संचालक जयप्रकाश साळुंखे, प्रभाकर माळी, जितेंद्र पाटील, संग्राम जाधव, सुभाष वडेर, दिलीप थोरबोले, संचालिका आश्विनी पाटील, अंजना सुर्यवंशी व सर्व संचालक, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.


हे पण पहा -----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆