BANNER

The Janshakti News

अनुत्तीर्ण विद्यार्थ्याना 'कॅरी ऑन' देण्यात यावा : अमोल वेटम

 
पालकमंत्री तथा कामगारमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचा विद्यार्थ्याना पाठिंबा ;

विविध आंबेडकरी संघटनेचे शिवाजी विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन संचालक यांना निवेदन=====================================
==============================

सांगली दि. १३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  उन्हाळी २०२२ (विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान व आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखांतील पदवी अभ्यासक्रमांसह) परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गामध्ये विशेष प्रवेश संधी देण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. याबाबतचे परिपत्रक पुणे विद्यापीठाने काढले आहे. अशाच प्रकारे शिवाजी विद्यापीठ यांनी देखील 'कॅरी ऑन' बाबत निर्णय घ्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे संपूर्ण एक वर्ष वाया जाणार नाही. अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र कांबळे, अमर शिंदे, सांगली शहर अध्यक्ष सुनील क्यातन, महेश कांबळे यासह रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.अजित जाधव यांना लेखी निवेदनाद्वारे केली. पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी देखील कुलगुरू यांना विद्यार्थ्यांच्या मागण्याचे पत्र पाठवले आहे. 
अमरावती विद्यापीठ यांनी देखील कॅरी ऑन बाबत निर्णय घेतलेला आहे, शिवाजी विद्यापीठ यांनी बी.टेक करिता असाच निर्णय घेतलेला आहे, उर्वरित सर्व कोर्सेससाठी विशेषतः विधी अभ्यासक्रमकरिता कॅरी ऑन लागू करावा. प्रथम तसेच द्वितीय वर्षामध्ये अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्रकरिता किंवा जेथे लागू असेल तेथे तात्पुरता प्रवेश काही अटी व शर्तीच्या अधिन राहून देण्यात यावा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी जसे अध्ययन, प्रात्यक्षिके व इतर बाबी महाविद्यालयाने इतर नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे पूर्ण करून घ्याव्यात.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆