BANNER

The Janshakti News

CRIME NEWS : सांगली शहर व परजिल्हयातील मोटर सायकल व मोबाईल चोरी करणारे २ चोरटे जेरबंद ; चोरीच्या ०६ मोटर सायकल व १ मोबाईल जप्त

सहा मोटारसायकली व एक मोबाईल असा जवळपास सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त





=====================================
=====================================


सांगली : सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.

गणेश शिवाजी गोसावी (वय ३५, रा. रामनगर, सांगली), समीर राजा देसाई (वय २३, रा. जवाहर नगर, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सांगली शहर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार
दुचाकी चोरीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक श्री. देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि १२.१०.२०२३ रोजी सायंकाळी ०४.०० वा. चे सुमारास पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार व गुन्हेप्रकटीकरण शाखेतील अमलदार असे पेट्रेलींग करत असताना पथकातील पोलीस अंमलदार संदीप पाटील, संतोष गळवे व गौतम कांबळे यांना त्याचे गोपनिय बातमीदामार्फत माहीती मिळाली की, शामरावनगर येथील झूलेलाल मंदीराचे मागे एक इसम चोरीची गाडी विक्रीसाठी आलेला आहे. मिळाले माहीतीची हकिकत मा. पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांना कळवून त्यांचे सूचनेप्रमाणे पोलीस पथकासह तेथे जावून पाहणी केली असता झूलेलाल मंदीराचे मागे एक इसम संशयित रित्या मिळुन आला. त्यावेळी छापा मारुन त्यास त्याब्यात घेवून त्याच्याकडील निळ्या मॅट रंगाची सुझीकी ॲक्सेस गाडी नं एम एच १० डीआर ०५९६ ही मोपेड गाडी मिळून आली त्या गाडीचे बाबत अधिक चौकशी केली असता सदरची मोपेड गाडी हि बदाम चौक सांगली येथुन चोरी केली असलेचे त्याने प्रथमदर्शनी सांगीतलेने सदरची गाडी जागीच जप्त केली. त्याचेकडे अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने संजयनगर, हालोंडी (शिरोली कोल्हापुर), क-हाड, जयसिंगपुर या ठिकाणाहून मोटर सायकल चोरी केल्या असलेचे सांगितलेने सदरच्या मोटर सायकली हया त्याने त्यांचे राहते घरासमोर लावले असलेचे सांगीतलेने त्याचे राहते घराचे समोर लावलेल्या ४ गाड्या मिळुन आल्या तसेच त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पेंटचे खिशात एक ग्रे कलरचा मोबाईल मिळुन आला त्याबाबत त्यास विचारणा केली असता त्याने सुरवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्या मोबाईलची अधिक माहीती घेतली असता सदरचा मोबाईल हा विष्णु आण्णा फळ मार्केट मघुन चोरी केली असल्याचे त्याने सांगितलेने लागलीच पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांनी सविस्तर नमूद मोटार सायकल पंचनाम्याने जप्त करुन ताब्यात घेतल्या आहेत.

दिनांक ०८/१०/२०२३ रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यात भादंसं कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयामध्ये शामरावनगर येथून मोटार सायकल एचएफ डीलक्स नंबर एमएच १० डी एफ ०२१३ ही मोटार सायकल चोरीची फिर्याद दाखल झाली त्यानुसार मिळालेल्या माहीतीच्या आधारे समीर राजा देसाई वय २३ वर्षे रा. इंचलकरंजी जवाहर नगर यास ताब्यात घेवुन दिनांक ११/१०/२०२३ रोजी अटक केली आहे.

अभिजीत देशमुख पोलीस निरीक्षक सांगली शहर पो. ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार , पोहेकॉ संदिप पाटील , पोहेकॉ श्रीपाद शिंदे , पोहेकॉ सचिन शिंदे , पोशि संदीप कुंभार , पोहेकॉ गुंडोपंत दोरकर , पोशि संतोष गळवे , पोशि गौतम कांबळे , पोशि योगेश सटाले , पोकों गणेश कांबळे , कॅप्टन गुंडवाडे (सायबर) , पोना अशफाक शेख आदींच्या पथकाने हि कारवाई केली असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणेचे सहा पोलीस उपनिरीक्षक अमोल लोहार हे करीत आहेत.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆