BANNER

The Janshakti News

12 ऑक्टोबर पासून संपूर्ण सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना काढणार जन आक्रोश पदयात्रा




==============================
==============================

सांगली : प्रतिनिधी               दि. 10 ऑक्टोबर 2023
 
यंदा ऊसाला   टनाला ५000 रुपये भाव मिळाला पाहिजे,दुधाला ६० रुपये हमी भाव मिळाला पाहिजे  वजन काटे ऑनलाईन करा , द्राक्ष बेदाण्याचा खप वाढविण्यासाठी टी व्हि वर  जाहिरात सुरू करा,  आदीसह अन्य मागण्यासाठी जनजागृती व संघटन या हेतूने गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर    ते ७ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण सांगली जिल्ह्यात जन आक्रोश  पदयात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली 

पदयात्रेचा शुभारंभ गुरुवारी सकाळी नऊ  वाजता  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाजी मंडई मारुती चौक सांगली येथील अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून होणार होणार आहे. यावेळी माजी खा राजू शेट्टी सावकार माद नाईक उपस्थित राहनार आहेत.
 
स्वाभिमानी आपल्या शिवारात स्वाभिमानी आपल्या गावात स्वाभिमानी आपल्या दारात समस्या तुमच्या उत्तर आमचे हे ब्रीदवाक्य घेवून ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.

 ही पदयात्रा तब्बल 22 दिवसाची असून 600 किलोमीटर ची आहे 22 मुक्काम आणि दररोज 25 किलोमीटर अंतर चालण्यात येणार आहे. ही यात्रा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व तालुक्यातील तालुक्याच्यां ठिकाणी व प्रमुख गावातून जाणार आहे.

  छत्रपती  शिवाजी महाराजांना अभिवादन करून सांगलीचे आराध्य दैवत गणपतीला साकडे घालून गणपती पेठ , स्टेशन चौक ,पुष्पराज चौक ते विश्राम बाग मार्गे  मिरज कडे जाणार आहे.  तेथून   मालगाव मल्लेवाडी बेडग मार्गे 13 तारखेला 5 वाजता मोहनराव शिंदे कारखाना येथे जाणार आहे तेथून एर्डोलो शिपुर सलगरे कोंगनोली हिंगणगाव मार्गे महाकाली कारखान्यावर 15 ऑक्टोबर रोजी 4 वाजेपर्यंत ही यात्रा पोहचेल  त्यानंतर शिरढोन बोरगाव योगेवाडी कुमठे कवठे एकद तासगाव  मणेराजुरी गव्हाण अंजनी सावलज बसतवडे बलगवडे आरवडे मांजरडे  मोराळे पेड हातनुर विसापूर बोरगाव पानमलेवांडी लिंब आळते  मंगरूळ मार्गे उदगिरी कारखान्यावर 22 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता पोहचणार आहे तेथून पारे विटा  घानवड गाडी मार्गे नागेवाडी कारखान्यावर  23 रोजी  पाच वाजता पोहचणार आहे त्यानंतर डोगराई रायगाव  कारखान्यावर नेवरी कडेपुर मार्गे 26 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता जाणार आहे तेथून ही यात्रा सोनहिरा  साखर कारखान्यावर कडेगाव तडसर मार्गे 27 ऑक्टोबर रोजी पाच वाजता पोहचणार आहे सोनहिरा साखर कारखान्यावर बळवडी तुर्ची मार्गे  ही यात्रा तासगाव कारखान्यावर 29 ऑक्टोबर रोजी पाच वाजता पोहचणार आहे तेथून ही यात्रा 1 नोव्हेंबर रोजी क्रांती कारखाना कुंडल येथे पोहचणार आहे त्यानंतर हुतात्मा कारखान्यावर व पुन्हा ही यात्रा वसंतदादा कारखान्यावर पोहचणार आहे. 

माजी खा राजू शेट्टी हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यावर पदयात्रा काढनार आहेत त्याची पदयात्रा  क्रांती कारखान्यावर एक नोव्हेंबर रोजी येणार आहे दोन्ही पद यात्राचा मिलाफ क्रांती कारखान्यावर होणार आहे दोन्ही पदयात्रा हुतात्मा वसंतदादा  कारखाना मार्गे सर्वोदय कारखान्यांवरून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत. 
ही यात्रा शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करणे, शेतकऱ्याचे संघटन करणे त्या माध्यमातून सरकारवर व साखर सम्राट, दूध सम्राट अडत दुकानदार यांच्यावर दबाव टाकून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेणे हा हेतू या पदयात्रेचा आहे.
उसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे त्या वाढीव खरचानुसर यंदाचा ऊस दर पदरात पाडून घेणे वजन काटे ऑनलाईन करणे ,तोडायला द्यावे लागणारे पैसे बंद करणे, साखर उताऱ्यातील चोरी थांबविणे ,द्राक्ष बेदाणा महामंडळ स्थापन करावे ,खप वाढविण्यासाठी टी वी वर जाहिरात सुरू करावी , दलालाची नोंदणी सुरू करावी, त्याच्या कडून दिपोजित घ्यावे, दुधाला हमी भाव लागू करावा, चालू दर कमी केला आहे तो 34 रुपये करावा, डाळिंब आणि द्रक्षावर प्रक्रिया उद्योग सुरू करावेत आदीसह अन्य मागण्यासाठी या पद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या पदयात्रेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन खराडे यांनी केले आहे या पदयात्रेत पोपट मोरे संदीप राजोबा संजय बेले भागवत जाधव आदीसह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆