BANNER

The Janshakti News

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे तृणधान्य पाककृती स्पर्धा उत्साहात..=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर                 दि. 12 ऑक्टोबर 2023

अमृतमहोत्सवी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी यांच्या वतीने माता पालकांसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तृणधान्य  पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या.पाककृती स्पर्धेचे उद्घाटन शेफाली दिपक पाटील व सौ.सुचेता सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे 
प्रथम - सौ.सोनाली सागर चौगुले,द्वितीय -सौ.शुभांगी सुनिल पाटील,तृतीय सुजाता प्रदीप मगदूम,उत्तेजनार्थ सौ.रेखा अरुण मव्दाण्णा,सौ.सारिका अभिजीत कांबळे.
या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सहेली जायंटस् भिलवडीच्या उपाध्यक्षा सौ.स्मिता सुबोध वाळवेकर,सौ.पूनम चंद्रशेखर कदम,बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.सुचेता कुलकर्णी यांनी परीक्षण केले.
प्रास्ताविक व स्वागत - मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.अर्चना येसुगडे यांनी सूत्रसंचालन केले. संध्याराणी मोरे यांनी आभार मानले.संस्थेचे संचालक संजय कदम,प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने,संजय पाटील,प्रगती भोसले,शरद जाधव आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆