BANNER

The Janshakti News

रिलायन्स ज्वेलर्स दरोड्यातील १ आरोपी अटक..

 

======================================
======================================




सांगली : वार्ताहर                     14 सप्टेंबर 2023

सांगली : सांगली शहरातील मार्केटयार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील एका आरोपीला ९ सप्टेंबर २०२३ रोजी ओडीसा राज्यातील बारगड जिल्हयातुन ताब्यात घेण्यात आले असून अंकुरप्रताप रामकुमार सिंग वय २५ वर्षे, रा. तारवान पो.स्टे. नौबातपुर, जि. पाटणा, राज्य बिहार असे त्याचे नाव आहे.

सांगली शहरातील मार्केटयार्डजवळ असलेल्या रिलायन्स ज्वेल्सवर टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील संशयितांचा गतीने शोध सुरू करण्यात आला होता. सांगलीपोलिसांनी बिहारमध्ये जाऊन तपास करत या प्रकरणातील चौघांची नावे यापूर्वी निष्पन्न केली होती. मात्र, हे संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
 मिरज रोडवरील रिलायन्स ज्वेलर्स रविवारी दि. ४ जून २०२३ रोजी भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून सहा कोटी ४४ लाख रुपयांची दागिने लंपास करण्यात आली होती. दरोड्यावेळी १४ कोटींहून अधिकचे दागिने लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर ज्वेलर्सच्या वतीने दिलेल्या फिर्यादीत साडेसहा कोटींची नोंद करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात गाजलेल्या या प्रकरणाचा सांगली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. अत्यंत आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न करण्यातही पोलिसांना यश आले होते.


 सतिश शिंदे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी दिलेल्या माहितीनुसार

वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील व विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पथके गुन्हा घडलेपासुन आरोपींचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास सदरचा गुन्हा हा पर राज्यातील सराईत टोळीने केला असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पुढील तपास कामी वरिष्ठांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथके आरोपींच्या शोधाकरीता तातडीने बिहार तसेच गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा व ओडीसा राज्यात तसेच महाराष्ट्रातील आठ जिल्हयामध्ये रवाना झाली होती. सदर टोळीबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नमुद गुन्हा हा अतिसंवेदनशील असल्याने अहोरात्र सखोल तपास करून नमुद पथकाने टोळीतील आरोपींची नांवे निष्पन्न करून पर राज्यामध्ये पन्नास दिवसापेक्षा जास्त दिवस वास्तव्य करून आरोपी शोध अनुशंगाने धागेदोरे मिळवले होते. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे वारंवार आपले वास्तव्य ठिकाण बदलत असल्याने त्यांची माहिती मिळण्यास अडथळे निर्माण होत होते. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस उपनिरीक्षक अकीब काझी व पथक यांचे बिहार राज्यात आरोपींचा शोधकार्य करीत असताना दाखल गुन्हयामध्ये सहभाग असलेला आरोपी  अंकुरप्रताप सिंग वय २५ वर्षे, वडीलांचे नाव रामकुमार, रा. तारवान पो.स्टे. नौबातपुर, जि. पाटणा, राज्य बिहार हा सध्या ओडीसा राज्यात असल्याबाबत माहिती मिळाली. सदर आरोपीची सखोल माहिती प्राप्त करून त्यास ओडीसा राज्यातील बारगड जिल्हयातुन ताब्यात घेण्यात आले. आरोपी अंकुर प्रताप सिंग यास मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १० दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.


सदरची कारवाई  विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, कोल्हापूर परिक्षेत्र यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, पोलीस निरीक्षक संजय मोरे विश्रामबाग पोलीस ठाणे , सपोनि पंकज पवार, सपोनि संदिप वाघमारे, विश्राम बाग पोलीस ठाणे, पोफौ/कुमार पाटील, स्था. गु.अ.शा पोफौ/आकिब काझी जिविशा. पोहेकों/ संदीप गुरव, बिरोबा नरळे, सागर लवटे, मच्छिद्र बर्डे, दरीबा बंडगर, नागेश खरात, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, विक्रम खोत, संदिप नलवडे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, पोशि/ अजय बेंदरे, विश्रामबाग पोलीस ठाणेकडील अनिल ऐनापुरे, बसवराज शिरगुप्पी, अमोल भोळे, इरफान पखाली, शिवाजी ठोकळ, आर्यन देशींगकर, संदीप घरते यांनी केली आहे.


सदर गुन्हयाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत. सदर आरोपीने चौकशी दरम्यान त्याचा गुन्हयामधील सहभाग व त्याचे साथीदार या संदर्भाने उपयुक्त माहिती दिली आहे. त्याचेकडे अधिक तपास चालु आहे. यातील ताब्यातील आरोपी हा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याचेवर बिहार व ओडीसा राज्यात जबरी चोरी व आर्म ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नमुद दाखल गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपी व इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. सदर टोळीविरुध्द बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरीसा तसेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆