भिलवडी : वार्ताहर दि.१३ सप्टेंबर २०२३
भिलवडी ता.पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविदयालयातील सांस्कृतिक विभाग , रेनबो फोरम व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य अभिभाषण व शिक्षक दिन या संयुक्त कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे - हास्य जत्राकार , दैनिक लोकमतचे वार्ताहर , महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व खाजगी मराठी शाळा , भिलवडीचे सहाय्यक शिक्षक , मा . शरद जाधव सरांनी वरील उद्गार काढले . अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे हे होते . सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.एस.एस. पाटील सर , डॉ.एस.डी. कदम सर उपस्थित होते .
मा. शरद जाधव सर पुढे म्हणाले की, महाविद्यालय हे संस्कार केंद्र आहे .या महाविद्यालयामध्ये मी घडलो . मला पहिल्यादा नासिक नाटय संमेलनामध्ये निमंत्रित हास्यकार म्हणून बोलविले तेव्हा २० मिनिटामध्ये मला तो कार्यक्रम करायचा होता तेंव्हा महाविद्यालयातील सर्व गुरुजनांनी माझ्या प्रयोगाची तालीम घेतली बरे वाईट सांगितले . आवाजाचा चढ उतार सांगितला त्यामुळे मी घडू शकलो . म्हणून महाविदयालय हे केवळ शिक्षणाचे केंद्र नसून ते शक्तीपीठ आहे. शिक्षण घेवून सुशिक्षित बेकार म्हणून फिरण्या ऐवजी सेवा करा . सेवा करण्यासाठी मराठी माणूस लाजतोय म्हणूनच आज तो जगाच्या दृष्टीने मागास आहे . एककाळ असा होता की भिलवडीव परिसरामध्ये घराच्या दारावर टिक् टिक् केली की दारात एक शिक्षक उभा असायचा पण आता ते चित्र बदलले दारावर टिक् टिक् करताच एक सुशिक्षित बेकार तरुण दारातून बाहेर येताना दिसतोय म्हणून हे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणाचा वापर केवळ नोकरीसाठी न करता व्यवहारासाठी वापर करावा . शिक्षणाने मानव व मानवी समाज परिपूर्ण , चारित्र्य संपन्न होतो . त्यासाठी योग्य शिक्षण घ्या असे ते म्हणाले .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे सर म्हणाले की ,आजची शिक्षण व्यवस्था आणि तिच्यामध्ये असणारे गुणदोष व व्यंग शोधत बसण्यापेक्षा रोजगाराभिमूख शिक्षणाची कास धरा . जे ज्ञानाबरोबर भाकरी देतं ते शिक्षण अशाच शिक्षणाची कास धरा असे ते म्हणाले .
यावेळी प्राचार्या कु. श्रेया मोरे , उपप्राचार्या कु. आरती टकले व श्री नितीन भोळे यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी सर्व गुरुजनांचा व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आजच्या शिक्षकांचा सत्कार करणेत आला
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु. ऋतुजा सुपनेकर हिने केले . पाहुण्यांचा परिचय कु. मशाळे हिने करून दिला . सूत्रसंचालन कु. धनश्री जाधव हिने केले तर आभार कु. निकीता पूरी हिने मानले या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी , विद्यार्थीनी , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆