yuva MAharashtra कृष्णा द वल्ड ऑफ केक अँण्ड स्विट भिलवडीकरांच्या पसंतीत उतरेल - मा. शरदभाऊ लाड

कृष्णा द वल्ड ऑफ केक अँण्ड स्विट भिलवडीकरांच्या पसंतीत उतरेल - मा. शरदभाऊ लाड




======================================
=====================================



भिलवडी : प्रतिनिधी                  दि. 12 सप्टेंबर 2023
 
भिलवडी ता. पलूस येथील नवउद्योजक सलमान सुतार , आरीफ सुतार व गौस सुतार यांनी भिलवडी मध्ये वसंतदादा नगर येथे मेनरोड लगत नव्याने कृष्णा केक व स्वीट  शॉप चालू केले असल्याने या केक व स्विट शॉप चे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य , क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाण्याचे अध्यक्ष मा.शरदभाऊ लाड यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी भिलवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विजयकुमार चोपडे , जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेसचे इरशाद पखाली व आय बी ब्रदर्स , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर , उपाध्यक्ष रणजित पाटील , महावीर चौगुले ,  अंकलखोपचे युवा नेते सतीश आब्बा पाटील , गजानन चौगुले , ऋषी भैय्या टकले , वाघाची तालीम पेठवडगाव आप्पा माने , दोस्ती पावर सोशल फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते , कृष्णा उद्योग समूह व साखरवाडी येथील सर्व मित्र परिवार  यांच्या सह ग्रामस्थ, व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते, 


यावेळी बोलताना शरदभाऊ लाड म्हणाले स्वच्छ व ताजे शिवाय चवीने खाणाऱ्यांनी एक वेळ या दुकानाला अवश्य भेट द्यावी, सुतार कुटुंबीयांनी केलेल्या या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल व कृष्णा द वल्ड ऑफ केक अँण्ड स्विट लवकरच भिलवडीकरांच्या पसंतीत उतरेल अशी अपेक्षा शरदभाऊ लाड यांनी या केक शॉपच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली.
यावेळी अनेक ग्राहकांनी व हितचिंतकांनी या स्विट व केक शॉप च्या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठी गर्दी केली होती.


 कृष्णा द वल्ड ऑफ केक अँण्ड स्विट शॉपमध्ये अनेक नामांकित कंपन्यांची
उत्पादने आईस केक मिठाई मटेरियल फरसाणा वाढदिवसाठी लागणारे सर्व साहित्य योग्य दरात व उत्तम प्रतीचे मिळेल असे या स्वीट व केक शॉपचे
मालक सलमान सुतार यांनी सांगितले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆