BANNER

The Janshakti News

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तांत्रिकरणावर भर द्यावा आणि कृषी क्रांती साधावी ...शरद लाड


=====================================
=====================================

पलूस/कुंडल : वार्ताहर              दि. 12 सप्टेंबर 2023

शेतकऱ्यांनी तांत्रिक शेतीची कास धरली तर कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न काढणे शक्य असल्याने, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी बाळ भरणी यंत्र चालवून शिक्षण शेतकऱ्यांना टेक्नोसॅव्ही पद्धतीने शेती करण्याचा कानमंत्र दिला.

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यामार्फत ऊसामध्ये यंत्राव्दारे बाळभरणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. कमी खर्चात ऊस शेती फायद्याची करण्यासाठी कारखान्यासाठी अध्यक्ष शरद लाड नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधपर्यंत पोहोचवत आहेत. या प्रात्यक्षिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अरुणअण्णा लाड होते.

यावेळी शेतकऱ्यांना संबोधताना शरद लाड म्हणाले, ऊसामध्ये बाळभरणी हे एक महत्त्वाचे आंतरमशागतीचे काम आहे. बाळभरणी केलेमुळे ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढते, जोमदार वाढ होते व गाळपा लायक ऊस संख्या वाढलेमुळे एकरी 6 ते 7 मे. टन उत्पादन वाढ होते. सध्या बाळभरणीचे काम बैलचलित किंवा ट्रॅक्टरचलित औजाराने केले जाते तथापी बैलजोडीची कमतरता व ट्रॅक्टर मुळे जमिनीचा वाढत असलेला घट्टपणा यावर पर्याय म्हणून एका व्यक्तीकडून चालवणे जाणारे व वजनाने हलके असे पेट्रोलवर चालणारे हे यंत्र शेतकर्यांच्या फायद्याचे ठरेल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तांत्रिकरणावर भर द्यावा आणि कृषी क्रांती साधावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी फलटणचे यंत्र तज्ञ उत्कर्ष
भोसले,उपाध्यक्ष दिगंबर पाटील, जी.प. सदस्य नितीन नवले संचालक पी. एस. माळी, शीतल बिरणाळे, दिलीप थोरबोले, अनिल पवार, अशोक विभुते, माजी संचालक
संदीप पवार, कुंडलिक थोरात, बबन पाटील, सुरेश पाटील, संतोष गुरव, संदीप जगदाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाण्याकडून यंत्राद्वारे बाळ भरणीचे प्रात्यक्षिकात बाळभरणी यंत्र चालवताना अध्यक्ष शरद लाड.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆