BANNER

The Janshakti News

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात निर्माण झालेल्या शैक्षणिक संस्थांचे कार्य स्वातंत्र्य लढ्या इतकेच महत्वपूर्ण : सदानंद भागवत



======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर            दि. १७ जुलै २०२३

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात निर्माण झालेल्या शैक्षणिक  
संस्थांचे कार्य  स्वातंत्र्य लढ्या इतकेच महत्वपूर्ण  आहे. राष्ट्र उभारण्याची,समाजासाठी चांगले आदर्श निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची असून भविष्यात चांगुलपणा निर्माण करणारी केंद्र बनाव्यात असे प्रतिपादन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी व्यक्त केले.

भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा व थोर समाजसेविका कै. डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित आयोजित "शिक्षकांची सद्यस्थितीतील जबाबदारी व समाजप्रती कर्तव्ये" या विषयांवरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण  संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच  शिक्षण संकुलात वृक्षारोपण करण्यात आले.भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यापुढे बोलताना सदानंद भागवत म्हणाले की,प्रेम आणि मदत संस्थेच्या विकासातील महत्वाची गरज असते.शिक्षक व संचालक,पदाधिकारी  यांनी स्वतःच्या विचारातून,संस्कारातून आणि कृतीतून विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा. डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या विचाराने भिलवडी शिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी  निष्ठेने व त्यागाने काम करीत असून ते प्रेरणादायी आहे.

संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.सहसचिव के.डी.पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा.आप्पासाहेब केंगार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.महेश पाटील यांनी आभार मानले.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,संचालक गिरीश चितळे, डॉ.सुहास जोशी,डी.के. किणीकर, प्रा.धनंजय पाटील,जयंत केळकर,संजय कदम,व्यंकोजी जाधव,बाळासाहेब जोशी,शशिकांत गानू ,सौ.लीना चितळे,प्रा.मनिषा पाटील,डॉ.दिपक देशपांडे,संजय मोरे,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी,प्रतिभा पवार आदींसह शिक्षण क्षेत्रातील विविध कार्यक्रम,शिक्षक,पालक, उपस्थित होते.


 डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सदानंद भागवत,विश्वास चितळे, डॉ.बाळासाहेब चोपडे,
गिरीश चितळे आदी मान्यवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆