BANNER

The Janshakti News

सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयातील "श्रीकांत मनंतनावर" यांचा, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने केला नागरी सत्कार..




=====================================
=====================================

सांगली : वार्ताहर                       दि.१४ जुलै २०२३

सहाय्यक कामगार आयुक्तसो, सांगली यांच्या कार्यालयात कार्यरत असणारे कामगारांचे हितचिंतक व  मित्रत्व नात्याने सतत सर्वांना मदत करणारे श्रमिक कष्टकरी कामगारांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून काम घेऊन येणाऱ्या कामगारांना बोलवून त्यांची अडचणी समजावून घेवून त्यांचे तत्परतेने काम मार्गी लावणारे, क्लार्क श्रीकांत मनंतनावर यांचे शॉप इन्स्पेक्टर पदी पदोन्नती झाले बद्दल त्यांचे श्रमिक, कष्टकरी कामगार यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या चांगल्या कामात सतत सहकार्य मदत करणारी एकमेव कामगार संघटना म्हणजेच वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने गुरूवार दिनांक १३/०७/२०२३ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त सो यांच्या दालनात प्रत्यक्षात भेटून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील विधायक वाटचाल व कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त मा. मु.अ.मुजावर साहेब आणि सरकारी कामगार अधिकारी मा.दिनेश पाटोळे साहेब तसेच सिनिअर निरीक्षक मा.चंद्रकांत साळुंखे साहेब, रामकृष्ण राऊत साहेब,खंडू चव्हाण, शिवराज तेडले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 



या प्रसंगी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मा.संजय संपत कांबळे तसेच जिल्हा महासचिव मा. अनिल मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष मा. विशाल धेंडे, जिल्हा उपाध्यक्ष मा.बंदेनवाज राजरतन, सांगली शहर अध्यक्ष मा.युवराज कांबळे, इसाक सुतार, जावेद आलासे, जयसिंग कांबळे, प्रदिप मचंद, सुभाष पाटील, सुनिल कांबळे, चंद्रकांत कांबळे, संगाप्पा शिंदे, मऱ्याप्पा राजरतन, विक्रांत सादरे शिवकुमार वाली, आनंदा गाडे, अनिल कांबळे, रोहित कांबळे, अशोक माळी, गणेश पवार, विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆