BANNER

The Janshakti News

सांगली जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठीशी ठामपणे राहू : ना.बच्चुभाऊ कडू




======================================
======================================

इस्लामपूर : वार्ताहर           दि. १७ जुलै २०२३


दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांची सांगली जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी नेमणूक न करता डी एड, बीएड सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नेमणूक  कराव्यात , आंतरजिल्हा बदली रद्द करण्याबाबतीत आलेला शासनदेश  रद्द करावा, दिव्यांग शिक्षकांना वाहन आणि लॅपटॉप देण्यात यावा,दिव्यांग व मागासवर्गीय शिक्षकांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे,1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षक व कर्मचारी यांना जुनीपेन्शन मिळाली. 2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व कर्मचारी यांच्या 7 व्या वेतनातील त्रुटी दूर व्हाव्यात, प्रहार शिक्षक संघटना प्रतिनिधीची  जि.प. च्या शिक्षण कमिटीवर घेण्यात यावे,प्राथमिक शिक्षकांना  आश्वासित  योजना लागू करावी,गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होऊन त्यांना कायम करणेत यावे यासह शिक्षकांवरती होणाऱ्या अशैक्षणिक कामाचा भरीमार बंद करून शिक्षकांना शिकवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


यासह विविध प्रश्नावरती आमदार बच्चू (भाऊ) कडू यांच्याशी शिक्षक संघटनेची सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना ना.बच्चुभाऊ कडू म्हणाले की सांगली जिल्ह्यामध्ये प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आमची प्रहार संघटना लढत आहे तिचं निश्चित आम्ही कौतुक करत आहोत. संपूर्ण राज्यांमध्ये प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठीशी आहोत असे सांगितले.


आभार श्री बामणे यांनी मानले.यावेळी जिल्हा नेते भानुदास पवार, जिल्हाध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर, केंद्रीय पत्रकार संघांचे अध्यक्ष रवींद्र लोंढे, जिल्हा सरचिटणीस श्री अमोल जाधव,जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेश जोशी, शिराळा अध्यक्ष रमेश तिके, वाळवा सरचिटणीस श्री सचिन बामणे, दत्ता पाटील, राजाराम मोहिते, दिव्यांग संघटनेचे श्री यशवंत जाधव,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆