BANNER

The Janshakti News

SSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार



=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर            दि. १६ जून २०२३

भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या मार्च २०२३  इ.१० वी मधील गुणवंत  विद्यार्थ्यांचा  सत्कार  व गुणपत्रक वितरण समारंभ संपन्न झाला. 

संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते गुलाब पुष्प, गुणपत्रक देवून विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. मंदार तेंडोलकर V.J.T.I मुंबई यांनी गुणानुक्रमे प्रथम तीन व मागासवर्गीय प्रथम तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रुपये व प्रत्येकी अग्निपंख हा ग्रंथ भेट देऊन यथोचित गौरव केला.

त्याचबरोबर विद्यालयाचे लेखनिक सुदर्शन सूर्यवंशी यांनी त्यांचे वडिल कै.पांडुरंग सूर्यवंशी यांचे स्मरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांना वृक्षरोपे भेट देऊन सत्कार केला.

संस्कृत व विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये कु साक्षी कुर्लेकर ९९.४०% प्रथम क्रमांक, सृष्टी चौगुले  ९८.४०% व्दितीय क्रमांक, सुखदा भोळे ९७.८०% तृतीय क्रमांक, 

तसेच नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थींचा ही सत्कार करण्यात आला. 



यामध्ये ऋतुजा कावरे, सौरभ वाघमारे, तन्वी वाघमारे,अदिती माने, प्रियांका गोरे, सानिया इनामदार,श्रध्दा शिंदे,विश्लेषा चौगुले,जाई शिंदे,जुई शिंदे, श्रुतिका चौगुले, आदित्य कदम, श्रावणी जाधव,प्रांजली सुर्यवंशी, प्रणाली मोरे,सुहानी मोहीते,रिया सावंत, महेश्वरी चव्हाण, प्रणाली कदम,राज सपकाळ या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक  शिक्षक सौ.रौनक तांबोळी, संदीप सदामते, बाबासाहेब शिकलगार,तानाजी पाटील, अमृत पोतदार या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे, सचिव मानसिंग हाके, संचालक  धनपाल किणीकर,संपत कदम , व्यंकोजी जाधव,जयंत केळकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मोरे, संस्था सहसचिव के.डी.पाटील, जी.एस.साळुंखे ,सौ.शिंदे मॅडम,म्हाळगे मॅडम, ज्ञानेश्वर भगरे, विक्रम पाटील, प्रल्हाद पाटील, शंकर बल्लाळ व पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी तर आभार  पर्यवेक्षक विनोद सावंत यांनी मानले .
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆