BANNER

The Janshakti News

आमदार अरुणअण्णा लाड यांच्या प्रयत्नामुळे पाचव्या मैलावरील रस्त्याचे अखेर नशीब उजाडले, दोन दिवसात होणार काम सुरू.



=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर            दि. १६ जून २०२३

कुंडल (ता.पलूस) : पाचवा मैल येथील 700 मीटर रखडलेल्या महामार्गाचे काम अखेर होणार पूर्ण यासाठी पदवीधर आमदार अरुणअण्णा लाड यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याशी Brown करून मार्ग काढला आहे यामुळे अनेक प्रवाशांचा जीव भांड्यात पडणार आहे.

विजापूर गुहागर महामार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले तरी पाचवा मैल येथे 700 मीटर महामार्ग वन खात्याच्या मंजुरी अभावी कित्येक वर्षांपासून रखडलेला होता, हा परिसर वन खात्याच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या मंजुरीची फाईल दिल्ली दरबारी रेंगाळत असल्याचे निदर्शनास आले होते यामुळे सामान्य नागरिकांना मात्र मरण यातना भोगाव्या लागत होत्या. अनेकांनी प्रयत्न करून परवानगी आजरोजी अखेर आली नसल्याने आमदार अरुणअण्णा लाड यांनी तडजोडीचा मार्ग काढून हा 700 मीटर चा महामार्ग जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत डांबरी करण्याची विनंती महामार्ग प्रशासनाला केली यावर त्यांच्याकडून होकारार्थी उत्तर आल्याने या महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांना खूप दिलासा मिळणार आहे. येत्या दोन दिवसात या महामार्गाचे काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अरुणअण्णा लाड

याच प्रकारे विजापूर गुहागर महामार्गावरील २२ पुलांची कामे ठेकेदारांच्या दिरंगाई मुळे रखडलेली होती त्याला ही मार्ग काढून ती सर्व डांबरीकरण करून देण्यासाठी आमदार लाड यांनी प्रयत्न केले होते. आजरोजी ते सर्व 22 पूल डांबरीकरण हे आमदार लाड यांच्याच प्रयत्नातून झाले आहेत भविष्यात पुन्हा निविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराला फक्त पुलांची कामे दिली जाणार असल्याने तात्पुरता तरी लोकांना होणारा त्रास कमी झाला आहे.


महामार्ग अभियंत्यांशी त्या 700 मीटर रस्त्याबाबत सविस्तर बोलणे झाले आहे येत्या दोन दिवसांत काम सुरू होईल यामुळे महामार्गामुळे होणारा त्रास नाहीसा होणार आहे, झालेली कामे उक्तृष्ठ पद्धतीनेच होणार आहेत.... आमदार अरुणअण्णा लाड.


22 पुलांची जशी कामे पूर्ण केली आहेत त्याच पद्धतीने दोन दिवसांत या 700 मीटर रस्त्याचे ही काम सुरू करतोय नागरिकांनी सहकार्य करावे... प्रकाश शेडेकर, महामार्ग उपअभियंता.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆