BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कयुम पठाण यांची मुबई पोलिस मध्ये निवड..=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर         दि. १४ जून २०२३

भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी येथील  
आजी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष कयुम पठाण  यांची नुकतीच मुबई पोलिस दलात  निवड झाली 
आहे. त्याबद्दल आजी माजी सैनिक संघटना भिलवडी यांचे अध्यक्ष कुमार पाटील,उत्तम भोई,मारुती यादव अभिजित यादव, मुबारक पठाण व संघटनेचे सचिव जी के शेख यांनी त्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
कयुम पठाण यांनी इंडियन आर्मी मध्ये 24 जानेवारी 2003 ते 31 जानेवारी 2020 पर्यंत ए सी चालक म्हणून 17 वर्षे काम केले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रथम पोस्टिंग कारगिल (जम्मू काश्मीर) ,सेकंड पोस्टिंग अहमदाबाद  ज्यावेळी ताज हॉटेल वर हमला झाला त्यावेळी मुनावा बॉर्डरवर डिपलाय,  जम्मू ,बबीना मध्य प्रदेश,  बेरकपुर, टेगा (पश्चिम बंगाल), नसीराबाद या ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली आहे.


 सेवानिवृत्ती नंतर कयुम पठाण यांनी भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ठ असे सामाजिक कार्य केले. कोरोना काळात विशेष पोलीस अधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.

 कयुम पठाण यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व  परीसरातील मित्र परिवारांकडून अभिनंदन होत आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆