BANNER

The Janshakti News

नववा आंतरराष्ट्रीय योग दिन भिलवडी हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा



======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर         दि.२१ जून २०२३

 भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीच्या प्रांगणात नववा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, सचिव मानसिंग हाके, सहसचिव के. डी पाटील उपस्थित होते. यावेळी विश्वयोग दर्शन केंद्र मिरजचे योग शिक्षक हर्षद प्रभाकर गाडगीळ यांनी   विद्यार्थ्यांना योगासनाची विविध आसने करून दाखवली. 


तसेच योगासनाचे जीवनातील  आरोग्यासाठीचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय उत्तम आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधना आवश्यक आहे असे मुख्याध्यापक एस. एस मोरे यांनी सांगितले.यावेळी सर्व शिक्षक बंधु-भगिनी मोठ्या प्रमाणात योगासने करण्यात सहभागी झाले होते. तसेच आज सुरू होणारे सूर्याचे दक्षिणायन व आजच्या सर्वात मोठ्या दिवसाची माहिती ज्ञानेश्वर भगरे यांनी सांगितली. 


कार्यक्रमाला शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही. एस तेली, पर्यवेक्षक विनोद सावंत, क्रीडा शिक्षक निलेश कुडाळकर, आर आर हिरुगडे, के आर पाटील अमृत पोतदार, प्रमोद काकडे, रुपेश कर्पे, शंकर केंगार, टी. एस पाटील, सुनिल भोये तसेच तसेच ज्युनिअर कॉलेज विभागाचे जी. एस साळुंखे, शिवाजी कुकडे, सौ मनीषा पाटील, रौनक तांबोळी, एस एस चव्हाण सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆