=====================================
भिलवडी : वार्ताहर दि.२४ जून २०२३
भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम , प्रायमरी ॲड हायस्कूल मध्ये शुक्रवार दिनांक 23 /06/ 2023 रोजी शाळेचा 20 वा वर्धापन दिन उत्साहात व चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोड्या वेगळ्या पद्धतीने शाळेचे द्विदशक हे वर्ष साजरे करण्यात आले त्यामध्ये पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. कवडे सर , व श्री. मगदूम सर यांच्या हस्ते करण्यात आले. मोबाईलच्या दुनियेतून विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन पुस्तकांचे वाचन करावे हा या पुस्तक प्रदर्शनामागचा उद्देश या कल्पनेला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, सर्वांनी पुस्तकांची खरेदी केली .
लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणा-या जादुगार व जादूचे प्रयोग "जादूचे खेळ" ज्युनिअर के.जी . ते चौथीच्या विदयार्थ्यांना दाखवण्यात आले . पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ' उबुंटू ' हा शैक्षणिक जीवनाशी निगडित सिनेमा दाखवण्यात आला.
शाळेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा थोडक्यात 'डॉक्युमेंटरी' रुपात दाखवण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता नववीतील विदयार्थी- विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या 'बुकलेटचे' उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. विश्वास चितळे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकांच्या मनोरंजनासाठी श्री शरद जाधव सर यांचा हास्य यात्रा हा विनोदी एकपात्री कार्यक्रम ठेवण्यात आला होता . त्यासाठी बहुसंख्य पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ,संस्थेचे सर्व संचालक, सेक्रेटरी,आजी माजी संचालक , विभाग प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी शाळेचा वीस वर्षाचा प्रवास थोडक्या शब्दांमध्ये सांगत पुढील वाटचालीसाठी शाळेला शुभेच्छा दिल्या.
तसेच सिनिअर कॉलेज चे प्राचार्य, सेकंडरी अँन्ड ज्युनिअर कॉलेज चे मुख्याध्यापक, खाजगी मराठी शाळेचे मुख्याध्यापक, मराठी बालवाडी विभागाच्या विभाग प्रमुख, शाळेतील सर्वांच्या प्रेरणास्थान सौ. लीना वहिनी चितळे, परिसरातील पत्रकार यांनी उपस्थिती दर्शविली.
शाळेच्या दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद व सेवक वर्ग उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆