BANNER

The Janshakti News

आमदार अरुण(आण्णा) लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप..=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर              दि.२४ जून २०२३

भिलवडी : विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी टिकून राहावी व शैक्षणिक साहित्य अभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पुणे पदवीधर  मतदार  संघाचे लोकप्रीय आमदार अरुण (आण्णा) लाड यांच्या  मार्गदर्शनाखाली माळवाडी ता. पलूस येथे शुक्रवार दि. २३ जून रोजी जि.प. प्रा.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व गावातील इतर गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना माळवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वह्या  वाटप करण्यात आले.


      राष्ट्रवादी पलूस तालुका सामजिक न्याय  सेल्सचे अध्यक्ष मनेश  मोरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे  राजेंद्र रुपटक्के , जवाहर पवार ,  विकास घाडगे , अभय गायकवाड , सागर गायकवाड , तानाजी गेजगे , गुलाब मोटकट्टे , अमित संदे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व माळवाडी गावातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करुन हा उपक्रम उत्साहात पार पाडला.
  यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी ठोंबरे , शिक्षक प्रविण पाटील , शिला चौगुले , रुपाली सागरे यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆