yuva MAharashtra भिलवडीत संस्कार केंद्राच्या पुस्तक वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर.. रसिका शिंदे प्रथम

भिलवडीत संस्कार केंद्राच्या पुस्तक वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर.. रसिका शिंदे प्रथम



=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर             दि.२१ जून२०२३

भिलवडी (ता.पलूस)  येथील पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वाचन स्पर्धेत रसिका दीपक शिंदे इयत्ता ८वी हिने १६ पुस्तके वाचून या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती संस्कार केंद्राचे केंद्र प्रमुख व वाचन स्पर्धेचे संयोजक सुभाष कवडे यांनी दिली आहे. इयत्ता ४थी ते ९वी या वर्गातील भिलवडी आणि परिसरातील ४५ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत हि स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे 


 ४५ स्पर्धकांपैकी ३२ स्पर्धकांनी पुस्तक वाचलेल्या नोंदीच्या वह्या संस्कार केंद्राकडे जमा केलेल्या आहेत या वह्यानवरून पहिले ५ क्रमांक निवडलेले आहेत. 
या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तके देऊन संस्कार केंद्राच्या वर्धापन दिन कार्यक्रमांत गौरविले जाणार आहे याचवेळी पूज्य सानेगुरुजी शिष्यवृत्ती वाटप,मोफत वह्याचे वाटप केले जाणार आहे.
 वाचन स्पर्धा उपक्रमाचे हे २० वे वर्ष असल्याची माहिती केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी दिलेली आहे स्पर्धेनंतर हि संस्कारकेंद्राचे वतीने वर्षभर विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यासाठी दिली जाणार आहेत विद्यार्थ्यांनी नियमितपणे पुस्तक वाचन उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार केंद्राचे वतीने करण्यात आले आहे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆