BANNER

The Janshakti News

खटाव तालुक्यातील सिंह सेनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या...




=====================================
=====================================

विटा  | दि. १ मे २०२३

विटा : आज १ मे रोजी सिंह सेना प्रमुख मा.श्री. शिवसाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंह सेनेच्या खटाव तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्य करण्यात आल्या. 


सिंह सेनेच्या विटा येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात 
 सिंह सेना खटाव तालुका युवा प्रमुख पदी श्री अविनाश महादेव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली व
 सिंह सेना खटाव तालुका सचिव पदी श्री विक्रांत लक्ष्मण हेगडे यांची नियुक्ती करण्यात आली. 
 सिंह सेना प्रमुख मा. श्री शिवसाहेब शिंदे यांच्या हस्ते या दोन्ही नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी सिंह सेना राज्य महिला प्रमुख पुष्पाताई बोबडे , आटपाडी तालुका महिला प्रमुख  मीनाताई बाबर ,  विटा शहर महिला प्रमुख रंजनाताई जाधव , सुरेखा लक्ष्मण हेगडे तालुका कामगार आघाडी प्रमुख हनुमंत भैय्या राठोड राहुल लक्ष्मण हेगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆