BANNER

The Janshakti News

माळवाडी : ग्रामपंचायत पोटनिवडणूक रणधुमाळी... पोटनिवडणुकीसाठी सहा अर्ज दाखल..=====================================
=====================================

भिलवडी | दि. ०२ मे २०२३
--------------------------------------------------------------------


पलूस तालुक्यातील माळवाडी  ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजिंक्यकुमार वसंत कदम यांच्या निधनामुळे वार्ड क्रमांक ५ मधील रिक्त झालेल्या जागेवर  पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दिनांक- २५/०४/२०२३  ते मंगळवार दिनांक- ०२/०५/२०२३ पर्यंत तहसील कार्यालय पलूस येथे उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्रे निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करण्यासाठी मुदत होती.   
  दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी प्रकाश लक्ष्मण कदम व निखिल चंद्रकांत कदम या दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले.
त्यामध्ये प्रताप आनंदा पुजारी , भाऊसाहेब गणपती रुपटक्के ,अजय अशोक कदम आणि राजीव सहदेव कदम यांनी अर्ज दाखल केले. वार्ड क्रमांक ५ मधील एका रिक्त जागेसाठी - १) प्रकाश लक्ष्मण कदम २) निखिल चंद्रकांत कदम ३) प्रताप आनंदा पुजारी ४) भाऊसाहेब गणपती रुपटक्के ५) अजय अशोक कदम ६) राजीव सहदेव कदम अशा एकूण सहा उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

 अशी माहिती निवडणूक अधिकारी  श्रीमती सुरेखा जाधव मंडळ अधिकारी भिलवडी यांनी दिली.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आज संपली असून उद्या ३ मे रोजी सकाळी ११:०० वाजलेपासून दाखल अर्जांची छाननी होईल. तर सोमवार दि. ८ मे पर्यंत दुपारी ३:०० पर्यंत माघारीसाठी मुदत असणार आहे. माघारीच्या मुदतीनंतर अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. आवश्यक त्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान घेण्यात येईल. तसेच १९ तारखेला तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालय पलूस येथे मतमोजणी पार पडेल. या पोटनिवडणुकीमुळे येत्या काळात गावाकुसातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆