BANNER

The Janshakti News

"शेतक-यांनी लागणीपुर्वी ऊस लागवड तंत्रज्ञान समजून घ्यावे" - आमदार अरूण(अण्णा)लाड


क्रांतिअग्रनी डॉ. जी.डी.बापू साखर कारखान्यावर मृदाशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद जगताप यांचे शेतकरी चर्चासत्र


=====================================
=====================================

कुंडल : दि.०४मे २०२३
-------------------------------------------------------------------

कुंडल (ता.पलूस) : ऊस शेतीतील वाढता खर्च बघता, कमी खर्चात शाश्वत उत्पादन मिळवण्यासाठी लागणीपूर्वीच ऊस लागवड तंत्रज्ञान समजून घेणेची गरज असलेचे मत क्रांतिअग्रणी डाॅ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरूण लाड यांनी व्यक्त केले. कारखान्या मार्फत आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद जगताप शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले," ऊस उत्पादक शेतक-यांनी आपल्या जमिनीची प्रत पाहून, लागणीचा हंगाम व ऊस जात याची निवड केली पाहिजे.भरघोस उत्पादनासाठी जमिन जैविक, भौतिक व रासायनिक सुपिक असली पाहिजे, यासाठी सेंद्रीय खतांबरोबरच जिवाणू खतांचा वापरही आवश्यक आहे.
हिरवळीचे खत हा सर्वात कमी खर्चात सेंद्रीय खतासाठी पर्याय आहे. पण शेतकऱ्यांकडून हिरवळीच्या खतासाठी ताग/धैंचा केला जात नाही, कारण यामधून पैसे मिळत नाहीत असा चुकीचा समज आहे पण अप्रत्यक्षरीत्या हिरवळीच्या खतामुळे जमिन समॄध्द होत असते.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, संचालक पोपट संकपाळ, आत्माराम हारुगडे, कुंडलिक थोरात, आप्पासाहेब जाधव, जयप्रकाश साळुंखे, दिनकर लाड, अशोक पवार, सुरेश पाटील, अरुण पाटील, संजय जाधव, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆