BANNER

The Janshakti News

क्रांती सह.साखर कारखान्याची सुमारे ४० कोटींची देणी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग.. आमदार अरुणअण्णा लाड

==============================

========================

कुंडल:वार्ताहर 

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ गाळप हंगामातील शेवटच्या महिन्यात गाळपाला आलेल्या ऊसाची रक्कम रुपये 
39 कोटी 75 लाख 42 हजार 93 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुणअण्णा लाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार लाड म्हणाले, या हंगामात 1 मार्च ते 19 मार्च अखेर 1 लाख 32 हजार 514 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले होते त्याचे प्रति मेट्रिक टन 3 हजार रुपये प्रमाणे 39 कोटी 75 लाख 42 हजार 93 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित अंतिम बिल शासनाच्या नियमाप्रमाणे निघेल ते शेतकऱ्यांना अदा केली जातील. तसेच तोडणी वाहतुकीची ही शेवटच्या महिनीपर्यंतची सर्व देयके संबंधित वाहन धारकांच्या नावे जमा केली आहेत.

आमदार लाड म्हणाले, आपण बँका, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक आणि कर्मचाऱ्यांची सर्व देणी आजवर वेळेत दिली आहेत. ईथुनपुढे अडचणीत असलेला सहकार सभासद, ऊस उत्पादक, कामगार, संचालक मंडळ, अधीकारी यांनी सर्वोतोपरी मदत केली तरच टिकू शकेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नोंदीतील जास्तीत जास्त ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


                आमदार अरुण (अण्णा ) लाड 

क्रांतीने शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अनेक ऊस विकास योजना आखल्या यातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर उंचावला आहे, शेतकऱ्यांनी अभ्यासू शेती केली तर उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ साधता येईल.कारखान्याने
वसंतदादा साखर संघ आणि पाडेगाव संशोधन केंद्रात विकसित होणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहेत त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी फायदा शेतकऱ्याने घ्यावा असेही ते म्हणाले.यावेळी यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड संचालक संपतराव सावंत, आत्माराम हारुगडे, अरुण कदम, अंकुश यादव, पोपट संकपाळ, सचिव आप्पासाहेब कोरे, प्रदीप लाड उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

https://youtube.com/@thejanshakatinews5707

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆