BANNER

The Janshakti News

संभूआण्णां पुण्यतिथी निमित्त भिलवडीत रात्र रंगली शाहिरीची





==============================
======================================

भिलवडी : वार्ताहर

भिलवडी गावचे सुपुत्रसंभूराजू यांनी भेदिक शाहीरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.चंद्र सूर्य असे पर्यंत हा वारसा टिकेल.राज्य शासनाने  पातळीवर क्रांती शाहिरां प्रमाणे भेदीक  शाहीरांना एक लाख रुपयांचा पुरस्कार सुरू करावा, या कलेला राजाश्रय द्यावा   अशी मागणी शाहीर देवानंद माळी यांनी केली.



भिलवडी ता.पलूस येथे सतराव्या शतकात दोन लाखाहून अधिक कवने रचणारे भेदिक शहीरीतील तुरा पक्षाचे प्रणेते कविवर्य  शाहीर संभाजी आण्णा कोष्टी यांचे पुण्यतिथी निमित   आयोजित भेदिक शाहिरी कार्यक्रमांत ते बोलत होते.प्रारंभी भिलवडी गावचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते समाधीचे पूजन करून शाहिरी मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला.


यावेळी  देवानंद माळी यांनी उत्सवासाठी त्यांनी पंचवीस हजाराची तर प्रा. डॉ. संपत पार्लेकर यांनी पाच हजार रुपये देणगी कोष्टी परिवारांकडे दिली.राज्यभरातून आलेल्या भेदिक शाहिरांमध्ये रात्रभर कलगी तुरा रंगला.लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. संपत पार्लेकर यांनी भेदिक कलेच्या इतिहासाविषयी माहिती सांगितली.साहित्यिक सुभाष कवडे यांनी संभाजी आणांच्या जीवन प्रवास आपल्या मनोगतातून सांगितला. शाहीर भीमराव चौगुले,
बळवंत मोराबाळे,बाळासाहेब पाटील,दत्तात्रय भुयेकर,एकनाथ पाटील,संदिप पाटील,पांडुरंग पाटील,शहाजी भोसले,रंगराव मालप,सखाराम खोत,बळवंत चौगुले,रामचंद्र जाधव,दिपक शिंदे,भगवान माने,अरुण शिंदे,आदींनी 
कला सादर केली.
अशोक कोष्टी, राहुल कोष्टी,मितल कोष्टी,अभिषेक कोष्टी,गौरीहार जमगे,जितेंद्र कोष्टी,शार्दुल कोष्टी आदींनी संयोजन केले.


 भिलवडी शाहीर देवानंद माळी यांनी देणगीचा धनादेश कोष्टी परिवारास प्रदान केला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆