yuva MAharashtra ऊस उत्पादक शेतक-यांनी आपल्या जमिनीची प्रत पाहून, लागणीचा हंगाम व ऊस जातीची निवड केली पाहिजे... ...राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद जगताप

ऊस उत्पादक शेतक-यांनी आपल्या जमिनीची प्रत पाहून, लागणीचा हंगाम व ऊस जातीची निवड केली पाहिजे... ...राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद जगताप



=====================================
=====================================

कुंडल : दि. ०४ मे २०२३

कुंडल ( ता.पलूस ) : ऊस उत्पादक शेतक-यांनी आपल्या जमिनीची प्रत पाहून, लागणीचा हंगाम व ऊस जातीची निवड केली पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे मृदाशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद जगताप यांनी केले.

ते कुंडल (ता पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी चर्चासत्रात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार अरुणअण्णा लाड होते.

डॉ.जगताप म्हणाले, भरघोस उत्पादनासाठी जमिन जैविक, भौतिक व रासायनिक सुपिक असली पाहिजे, यासाठी सेंद्रीय खतांबरोबरच जिवाणू खतांचा वापरही आवश्यक आहे.
हिरवळीचे खत हा सर्वात कमी खर्चात सेंद्रीय खतासाठी पर्याय आहे. पण शेतकऱ्यांकडून हिरवळीच्या खतासाठी ताग/धैंचा केला जात नाही, कारण यामधून पैसे मिळत नाहीत असा चुकीचा समज आहे पण अप्रत्यक्षरीत्या हिरवळीच्या खतामुळे जमिन समॄध्द होत असते.

यावेळी अध्यक्षस्थानावरून आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, ऊस शेतीतील वाढता खर्च बघता, कमी खर्चात शाश्वत उत्पादन मिळवण्यासाठी लागणीपूर्वीच ऊस लागवड तंत्रज्ञान समजून घेणेची गरज आहे. यासाठी कारखाण्यामार्फत राबवित असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.


यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, संचालक पोपट संकपाळ, आत्माराम हारुगडे, कुंडलिक थोरात, आप्पासाहेब जाधव, जयप्रकाश साळुंखे, दिनकर लाड, अशोक पवार, सुरेश पाटील, अरुण पाटील, संजय जाधव, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, ऊस विकास अधिकारी विलास जाधव, यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆