BANNER

The Janshakti News

पलूस-कडेगाव तालुक्यात शरद फाउंडेशन संचिलीत शरद आत्मनिर्भर अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेले रक्तदान शिबीर हा उपक्रम जनतेसाठी जीवनदान ठरेल : शरद लाड

 

======================================
======================================

भिलवडी : प्रतिनिधी (२९ मे २०२३)भिलवडी (ता.पलूस) : शरद फाउंडेशन संचिलीत शरद आत्मनिर्भर अभियान पलूस- कडेगाव यांचे मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी  जयंती (2023) निमित्त भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
 शिबिराचे उदघाटन सांगली जिल्हा परिषदेचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य मा. शरद लाड यांच्या हस्ते संपन्न झाले.प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीचे पलूस- कडेगाव विधानसभा मतदासंघातील जिल्हा परिषद गटामध्ये रक्तदान शिबीर आयोजित करून रक्ताचा तुटवडा भासून देणार नाही व हा उपक्रम जनतेसाठी जीवनदान ठरेल  तसेच रक्ताच्या गरजवंताला हवे तितके रक्त मिळवून देऊ व कोणालाही रक्ताची आवश्यकता असेल त्यांना यामध्यमातून रक्ताचा पुरवठा केला जाईल अशी ग्वाही मा. शरद लाड यांनी दिली..


या कार्यक्रमासाठी जि. प सदस्य नितीन बाबा नवले, सुरेंद्र वाळवेकर, सतीश आबा पाटील, श्रेनिक पाटील यांच्या सह अनेक मान्यवर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆