BANNER

The Janshakti News

आनंदी जाधव,मोनिका साळुंखे यांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान..

धनगांव ग्रामपंचायती मार्फत महिलांचा सन्मान..


=====================================
=====================================

भिलवडी : वार्ताहर (दि.३१ मे २०२३)

महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत धनगांव यांच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सौ.आनंदी पोपट जाधव व सौ.मोनिका विजय साळुंखे यांना गौरविण्यात आले. स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना सतपाल साळुंखे म्हणाले की,महिलांनी अहिल्यादेवी होळकर यांनी
कर्तृत्वातून राजकारण व सामाजिक कार्याला दिशा दिली.त्यांनी निर्माण केलेल्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा.अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिलेला पुरस्कार महिला वर्गासाठी प्रेरणादायी असा आहे.

यावेळी उपसरपंच सौ.आशा केवळे,ग्रामपंचायत सदस्य हणमंत यादव,वैशाली यादव,दिपाली जाधव,कांचन देसाई, सौ.सुजाता पवार,मंगल बन्ने, संगिता रोकडे,अलका चव्हाण,रुपाली काईंगडे,प्रशांत साळुंखे,बिरबल बन्ने,
चंद्रकांत यादव,सुदाम जामदारे, सागर चव्हाण,ऋषीकेश भोसले आदी उपस्थित होते.सौ.आनंदी जाधव,सौ.मोनिका साळुंखे यांना सभापती सतपाल साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆