BANNER

The Janshakti News

सौ.उषाताई पाटील , सौ. सुशिला हाबळे यांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान


भिलवडी ग्रामपंचायती मार्फत महिलांचा सन्मान


=====================================
=====================================

भिलवडी प्रतिनिधी : दि. ०३ जून २०२३

भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी शहर व परिसरातील महिलांच्या  ताई , सौ. उषाताई उत्तमराव पाटील यांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत, पुण्यश्लोक राणी अहिल्यादेवी होळकर या  पुरस्काराने मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांचे स्वाक्षरीयुक सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ, रोख रक्कम देऊन भिलवडी शहर ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यवती विद्या सचिन पाटील व सदस्यांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आले. सौ. तेजा हाबळे यांनाही याच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.एडस् निर्मुलन व विविध सामाजिक कार्य  हाबळे यांनी  केली आहेत. यावेळी सौ. सिमा शेटे , तेजा जांभळे, वंदना रांजणे व महिला हजर होत्या.


स्वर्गीय डॉ. पतंगरावजी कदम, लोकनेते बाळासाहेब काका पाटील यांचे विचार पुढे घेऊन जाताना मला सीआरपी या अल्प मोबदल्यातील पदावर काम करताना सर्व प्रकारच्या महिला सक्षमीकरणासाठी भिलवडी व परिसरात शंभराहून अधिक महिलाबचत गटांत कोटींची  कर्ज वाटताना सर्व पक्षाच्या सदस्यांनी मदत केली आहे. माझे सामाजिक काम या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मुळे अधिक प्रमाणात करेन असे मनोगत सौ. उषाताई पाटील यांनी व्यक्त केले.

 सौ. सुशिला विकास हाबळे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. एडस् या जागतिक स्तरावर रोगाचे रोखथाम करणे, या आजाराबद्दल समाजातल्या सर्व घटकांना जागृती करताना, परदेशात जाऊन अभ्यास करून, आपला अमूल्य वेळ देणाऱ्या भिलवडी येथील कन्या, सौ. सुशिला विकास हाबळे परवाश्रमिच्या कुंदेताई. यांना सरपंच सौ. विद्या सचिन पाटील यांनी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, श्रीफळ रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. 



यापुढे माझे महिला संरक्षण, उधोग प्रशिक्षण  हे संग्राम संस्था  सह सर्व सामाजिक काम कुटुंबियांचे सहकार्य मुळे माझे या अहिल्यादेवी पुरस्कार मिळालेने अधिक जोमाने सुरू ठेवेन असे  मनोगत सौ. हाबळे यांनी व्यक्त केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆