BANNER

The Janshakti News

ऊसावरील "चाबूककाणी" रोगाच्या नियंत्रणासाठी शुध्द बेण्याचा वापर आवश्यक .... डॉ. सुरज नलवडे



=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर (दि.२८ मे २०२३)

ऊसावरील "चाबूककाणी" हा विषाणूजन्य रोग आहे. या रोगाचा प्रसार अशुद्ध बियाणे वापरल्यामुळे तसेच हवेतून होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी प्रमाणित बेणेमळ्यातील शुद्ध बियाणे वापरणे आवश्यक असलेचे प्रतिपादन मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे रोगशास्त्र तज्ञ डॉ. सुरज नलवडे यांनी केले.

ते क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात वसगडे (ता.पलूस) येथील मोहन ईश्वरा पवार यांच्या चाबूककाणी रोगाच्या प्रभावीत ऊसक्षेत्राची मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडील शास्त्रज्ञ डॉ. सुरेश उबाळे, एस.एम गांगुर्डे व डॉ सूरज नलवडे यांनी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. 

डॉ.नलवडे म्हणाले, “ऊसावर अनेक प्रकारचे रोग येतात.यामध्ये प्रामुख्याने तांबेरा, तपकिरी ठिपके, पोक्काबोईंग चाबूककाणी या रोगांचा समावेश आहे. चाबूककाणीचा प्रादुर्भाव ऊसवाढीच्या सर्व अवस्थेत दिसून येतो. लागण पिकापेक्षा खोडवा पिकात या रोगाचे प्रमाण जास्त आढळते. रोगाची लागण झालेल्या ऊसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा पट्टा बाहेर पडतो या पट्ट्यातील काळी पावडर म्हणजे या रोगाचे बीज आहे, हे बीज बेण्यावाटे व हवेवाटे प्रसार होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. चाबूककाणीच्या नियंत्रणासाठी शुध्द बेण्याचा बेणेप्रक्रिया करून वापर करणे, रोगग्रस्त ऊसाची बेटे मुळासहीत काढून जाळून टाकणे आणि प्रादुर्भावग्रस्त ऊसावर टिल्ट किंवा कॉन्टॉफ १०० मिली. १०० लिटर पाण्यातून फवारणी करणे आवश्यक आहे. चाबूककाणी रोगाचे प्रमाण ५ टक्केपेक्षा जास्त असलेस ऊस काढून टाकावा व त्या शेतामध्ये किमान एक वर्ष ऊसपिक न घेता फेरपालटीची पिके घेतल्यास अधिक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसविकास अधिकारी विलास जाधव व कारखान्याच्या ऊसविकास विभागातील कर्मचारी उपस्थित होते.


क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वसगडे (ता.पलूस) येथे चबुककाणी ग्रस्त ऊस क्षेत्राची पाहणी करताना शास्त्रज्ञ
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆