BANNER

The Janshakti News

पारधी घरकुलाचे जागा मागणी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे प्रांतधिकारी यांचे आदेश.. सुधाकर वायदंडे यांची माहिती..



======================================
======================================

इस्लामपूर , वार्ताहर : दि.२७ मे २०२३

इस्लामपूर : आदिवासी पारधी समाजातील घरकुल लाभासाठी पात्र लाभार्थ्यांचे शासकीय जागा मागणी बाबतचे प्रस्ताव तत्काळ देण्याचे आदेश प्रांताधिकारी संपत खिलारी  दिले आहेत अशी माहिती दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व आदिवासी पारधी हक्क अभियानाचे नेते सुधाकर वायदंडे यांनी दिली.
          पारधी समाजाच्या घरकुलाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यात यावा या व अन्य मागण्या बाबतचे निवेदन दलित महासंघाच्यावतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
        सुधाकर वायदंडे म्हणाले,'एक गांव एक पारधी कुटुंब'या धोरणानुसार पारधी कुटंबाना पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने गावामध्ये जागा देण्यात आलेली आहे परंतु अजून त्यांना घरकुलचा किंवा कोणत्याही शासकीय योजनानांचा लाभ देण्यात आलेला
नाही.काही योजणांची फक्त घोषणा होते परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही.
              अजूनही काही कुटुंबाना गांव मिळालेले नाही त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न आहे ती लोक उघड्यावर राहत आहेत त्यांचाही गांव देऊन प्रशासनाने याकडे सहानुभूतीपूर्वक पाहणे गरजेचे आहे.
              दलित  महासंघाच्या वतीने 15/03/2023 रोजी वाळवा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते त्या अनुषंगाने 22/05/2023 रोजी जागा मागणी बाबतचे प्रस्ताव पंचायत समितीकडे देण्याचे लेखी पत्र संबंधित गावच्या ग्रामसेवकांना काढले होते परंतु अद्यापही कार्यवाही झालेली नाही.
             प्रांताधिकारी यांनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन घरकुलाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावू ,ज्या लोकांचे अद्यापही जातीचे दाखले निघालेले नाहीत त्यांना आठ दिवसात जातीचे दाखले तसेच आधार कार्ड काढण्यासाठी स्वतंत्र कॅम्प लावण्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी दिले आहे.
                पारधी पुनर्वसनाबाबत प्रशासन कडून सकारात्मक राहून केवळ आश्वासन देण्यात येते परंतु आश्वासनांची पूर्तता झाली तरच खऱ्या अर्थाने पारधी समाजाला न्याय मिळेल पारधी पुनर्वसनासाठी शासनाने ठोस अंमलबजावणी न करता दुर्लक्ष केल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
             निवेदनावर सुधाकर वायदंडे, दिनकर नांगरे, जितेंद्र काळे, टारझन पवार, राकेश काळे, रोशना पवार , गुलछडी काळे यांच्या सह्या आहेत.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆