BANNER

The Janshakti News

फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारण्याचं बळ मुलांच्यात निर्माण करून भविष्य घडविण्यात शिक्षकांच्या बरोबर पालकांचीही जबाबदारी ....श्री. एम.आर. पाटील



======================================
======================================

भिलवडी | दि. ०१ मे २०२३
--------------------------------------------------------------------

पलूस तालुक्यातील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल, भिलवडी मध्ये शनिवार दि. २९/०४/२०२३ रोजी " सिनियर के.जी."  वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस कार्ड डिस्ट्रिब्युशन (निकाल पत्रक वितरण ) समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबासाहेब चितळे महाविद्यालय  सहाय्यक प्राध्यापक , श्री. महेश पाटील हे होते.


फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारण्याचं बळ मुलांच्यात निर्माण करून मुलांचे भविष्य घडविण्यात शिक्षकांच्या बरोबर पालकांचीहि जबाबदारी आहे असे
 उदगार यावेळी बोलताना महेश पाटील यांनी काढले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  मा.के. डी पाटील सर- सहसचिव  भिलवडी शिक्षण संस्था व विभाग प्रमुख इंग्लिश मिडियम, प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी   , कु. विद्या टोणपे- मुख्याध्यापिका इंग्लिश प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी   सिनिअर के.जी. मधील सर्व विद्यार्थ्यांना निकाल पत्रकाचे वितरण करण्यात आले. तर ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या  विद्यार्थ्यांना  जनरल प्रोफिशियंसी सर्टिफिकेट पाहुण्यांचे हस्ते देण्यात आले.
त्याचबरोबर यावर्षी शिक्षणाबरोबरच, विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेल्या व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांला प्रथमच " स्टुडंट ऑफ द इअर " हा  अवार्ड  देण्यात आला. 


सन २०२२-२३ चा " स्टुडंट ऑफ द इअर  अवार्ड 
 " कु ईशा भाग्येश चौगुले "  या विद्यार्थिनीला मिळाला




या कार्यक्रम प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी व पालकांनी शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
 

   
यावेळी कार्यक्रमाचे  प्रमुख पाहुणे प्राध्यापक , श्री. महेश पाटील यांनी आपल्या भाषणात  इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून देत पालकांच्या सहकार्याबद्दल अभिनंदन केले. शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत मुलांच्या जडणघडणीत या गोष्टी कशा उपयोगी आहेत व गरजेचे आहेत हे सांगितले.  तसेच शक्यतो मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे,अशी त्यांनी पालकांना विनंती केली.
         यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. के. डी. पाटील सर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  म्हणाले की, आजच्या कार्यक्रमातील पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहता त्यांनी पालकांना के.जी. मधील अनौपचारिक शिक्षणाबरोबरच इयत्ता १ ते १० पर्यंत आपल्या पाल्याच्या औपचारिक शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.  
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने मॅडम, सूत्रसंचालन  सौ. अश्विनी सूर्यवंशी टिचर  व स्वागत व आभार मंजूश्री सपकाळ टिचर यांनी केले. कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆