BANNER

The Janshakti News

महाराष्ट्र दिनी त्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य : आमदार अरुणअण्णा लाड



======================================
==============================

कुंडल | दि. ०१ मे २०२३
------------------------------------------------------------------

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या निर्मिती दिवसाला त्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे हे आपले म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसादारांचे आणि तमाम महाराष्ट्रीयांचे आद्य कर्तव्य आहे. असे प्रतिपादन आमदार अरुणअण्णा लाड यांनी केले.

आमदार लाड म्हणाले, १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. हा दिवस मराठी माणसाचा आहे.

२१ नोव्हेंबर १९५६ रोजी, मुंबईतील फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले होते. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश देणेत आला होता. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

तसेच १ 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली. १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८० हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो.

जगातिल कामगारांनी एक होऊन, पिळवणूक थांबवण्यासाठी चळवळ झाली आणि यासाठी आठ तासांचा दिवस ठरवून दिला आणि पिळवणूक थांबवण्यात आली या दोन्ही दिवसांना आणण्यासाधरण महत्व आहे या दोन्ही दिवसांचे महत्व ओळखून त्यांचे ऋणी राहूया या कार्यांचे स्मरण ठेवूया.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆