BANNER

The Janshakti News

रिपब्लिकन (A) पक्षाच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व जागतीक कामगार दिना-निमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.


विविध क्षेत्रातील कामगारांचा पुष्प देऊन सन्मान संपन्न.


==============================
==============================

मिरज | दि. ०१ मे २०२३

____________________________________________________


जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्तानं आज १ मे रोजी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया( आठवले) सांगली जिल्हा व मिरज शहर च्या वतीने मिरज शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

यावेळी जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) मिरज शहर यांचे वतीने विवीध क्षेत्रामध्ये सेवा बजावत असणाऱ्या कामगार बंधूंचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करणेत आला.


यावेळी बोलताना रिपब्लिकन पक्षाचे आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे म्हणाले, भारताचे श्रममंत्री म्हणून काम करताना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. उद्योजक आणि कामगार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक परिषद स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सर्वच प्रकारच्या कामगारांना त्यांचे हक्क, वेतन, कामाचे तास, विमा, आरोग्य संरक्षण, प्रसुती रजा अशा अनेक बाबतीत संरक्षण मिळावे म्हणून कामगार कायद्यामध्ये बदल करुन समानता आणली. कामगारांना सन्मानतेने जिवन जगता यावे याकरिता कायदे बनवून कामगार बंधूंचे जिवन सुखी समृद्धी बनवणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस कोटी कोटी प्रणाम् व महाराष्ट्र दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.


यावेळी रिपब्लिकन(आठवले) पक्षाचे मिरज शहर प्रभारी तथा शहर उपाध्यक्ष शानूरभाई पानवाले यांनी उपस्थित सर्व कामरांना गुलाब पुष्प देऊन कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज चे माळी कर्मचारी मा. अशोक कांबळे, बांधकाम कर्मचारी मा. किशोर लोंढे, सुरक्षारक्षक कर्मचारी मा. मोहसिन सय्यद, असंघटीत कर्मचारी मा. जमिर झारी, मा. महंमद मुल्ला, यांचे सोबत मा. प्रमोद वायदंडे, मा. श्रीधर बीरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆