======================================
======================================
भिलवडी | दि. ३० एप्रिल २०२३
--------------------------------------------------------------------
भिलवडी : पलूस कडेगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार , माजी राज्य मंत्री विश्वजित कदम हे आज रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी पाटील डेअरी उद्योग समुहाचे उद्योजक धन्यकुमार चवगोंडा पाटील (राजूदादा) यांचे चिरंजीव निखिल यांच्या लग्न सोहळ्यासाठी माळवाडी तालुका पलूस येथे आले असता त्यांनी आवर्जून माळवाडी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक श्री. सचिन बापूसो चौगुले यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांनी संस्थेची सांपत्तिक स्थिती आमदार विश्वजित कदम यांना दिली. संस्थेच्या ठेवी , संस्थेने आजपर्यंत केलेले कर्ज वाटप, संस्थेचा स्वनिधी, संस्थेची गुंतवणुक, संस्थेचा कारभार, संस्थेची सभासद संख्या याबाबत देखील सविस्तर माहिती दिली. संस्था सभासदांना तत्पर सेवा देते त्यामुळे संस्थेचे सभासद संतुष्ठ असल्याचे श्री. सचिन चौगुले यांनी सांगितले.
यावेळी आमदार विश्वजित कदम यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक सचिन बापूसो चौगुले व माळवाडी शाखा सल्लागार मंडळाचे चेअरमन बाळासो देवेंद्र चौगुले यांनी सत्कार केला.
आमदार विश्वजित कदम यांनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गगार काढले व शाखेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान माळवाडी साठेनगरमधील काही युवक कार्यकर्ते यांनी आ.विश्वजित कदम यांची भेट घेऊन साठेनगरमधील श्री.अमर बाळासो वायदंडे या २८ वर्षाच्या तरुणाला झालेल्या किडणीच्या आजाराबद्दल व संबधित दवाखान्यात येणाऱ्या खर्चाबद्दल माहिती सांगून आर्थिक मदतीची मागणी केली.यावेळी आमदार विश्वजित कदम यांनी संबधित तरुणांच्या वैद्यकीय उपचारासाठी भरघोस मदतीचे आश्वासन दिले.
या प्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य संग्राम (दादा) पाटील , दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब (काका) मोहिते , तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब मोहिते , सां.जि.काँग्रेस कमिटी सरचिटणीस बी.डी.पाटील , संताजी जाधव , शशिकांत उंडे , सुबोध वाळवेकर , कपील शेटे , गणेश महिंद , विनाय भोळे , आष्टा शाखेचे चेअरमन संजय डांगे , व्हाइस चेअरमन सौ.संगिता कोरेगांवे , मँनेजर प्रोमोद कोरेगांवे , माळवाडी शाखा अधिकारी यशवंत राजोबा यांच्या सह सर्व संचालक मंडळ , सल्लागार मंडळ , सर्व कर्मचारी , सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆