BANNER

The Janshakti News

शरद लाड हे येणाऱ्या काळात विधानसभेत दिसतील : झुंझारराव पाटील


शरद लाड यांनी जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करावे झुंझारराव पाटील


======================================
======================================

भिलवडी | ३० एप्रिल २०२३
-------------------------------------------------------------------

आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलमध्ये सदस्य पदी निवड होणे ही शरद लाड यांच्या कामाची व नेतृत्वाची पोहोच पावती आहे. शरद लाड हे सर्वसामान्य जनतेचे तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत आहेत. त्यांचे प्रयत्न पाहता येणाऱ्या काळामध्ये शरद लाड हे विधान परिषदेवरती नाही तर विधानसभेत दिसतील यामध्ये शंकाच नाही. असे प्रतिपादन आष्टा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी केले. 

भिलवडी (ता.पलूस) येथे शरद लाड यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या ससदस्यपदी निवड झाल्याबद्दल आयोजित नागरी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.पाटील म्हणाले, शरद लाड यांची सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याची भूमिका असते. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्रत्येक घटकाच्या उन्नतीचे धोरण ठेवून खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवली आहे.

यावेळी शरद लाड म्हणाले, शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊरावांनी माणसातील अस्मिता जागी केली, अज्ञान हेच बहुजनांच्या झोपडीतील दारिद्र्याचे कारण आहे हे ओळखून त्यांनी शैक्षणिक सुधारणांवर भर दिला. अठरापगड जातीच्या मुलांना एकत्र आणून ज्ञानाची बाग फुलवली. कर्मवीरांनी साताऱ्यात लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर व देशात पसरविला अशा या महान तपस्वी कार्यकर्तृत्वाची धुरा सांभाळत आज रयत शिक्षण संस्था जगासमोर आदर्श ठरली आहे.या कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र मोकाशी, दिग्विजय मोकाशी व मित्रपरिवार यांनी भिलवडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये केले होते. या कार्यक्रमामध्ये भिलवडी परिसरातील नागरिकांनी शरद लाड यांचा सत्कार केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि प सदस्य संग्राम पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आनंदराव (भाऊ) मोहिते, आष्टा नगरपालिकेची माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, सुरेश मोकाशी, विजय पाटील, राजेंद्र चौगुले, दिलीप पाटील, माधव पाटील यांचेसह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆