BANNER

The Janshakti News

सेकंडरी स्कूल भिलवडीचे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश..======================================
======================================
 
भिलवडी (ता.पलूस) :  भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल मधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. 

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत (  NMMS) कु. सानिका संजय साळुंखे हिने 123 गुण मिळवून जिल्हा  गुणवत्ता यादीत EWS प्रवर्गात 2 रा क्रमांक मिळविला. 


 तसेच राज्य शासनाच्या सारथी या संस्थेच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती कु.पाटील उत्कर्षा कृष्णराज , पाटील तेजल विकास, पाटील श्रावणी दिलीप , यादव श्रद्धा दिलीप ,साळुंखे सोनम विजयसिंह ,पाटील समृद्धी सुधीर , परब आर्या प्रदीप , पाटील हर्षवर्धन रवींद्र , सूर्यवंशी प्रतीक्षा रमेश , मोकाशी निखिल अरुण , जाधव आर्यन अभिजीत ,यादव हर्षवर्धन श्रीकांत ,जाधव श्रुती श्रीकांत , पाटील समीक्षा सतीश , भोळे प्राची दिलीप , पाटील समीक्षा संभाजी , चव्हाण पृथ्वीराज सतीश ,कणसे संस्कृती राहुल, सूर्यवंशी संकेत दादासो ,जाधव आदित्य अभिजित या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली . 


    विद्यार्थ्यांना मिळालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील उज्वल यशाबद्दल भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , विश्वस्त व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक , पर्यवेक्षक  यांनी    या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख विजय तेली, NMMS विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भगरे, मार्गदर्शक- राजीव आरते,  प्रल्हाद पाटील, पौर्णिमा धेंडे, प्रमोद काकडे, तुषार पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.शाळेने स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेचा आलेख चढता ठेवल्याने शाळा व संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆