BANNER

The Janshakti News

सांगली येथील पारिजात काॅलनी , इंदिरानगर झोपडपट्टीत जिओ कंपनीचा टाॅवर होऊ देणार नाही ---- शेखर मोहीते





======================================
======================================

सांगली | दि. ३० एप्रिल २०२३

          सांगली, मिरज, कुपवाड हद्दीतील पारिजात काॅलनी वाॅर्ड क्रमांक 17 या ठिकाणी जिओ कंपनी आपल्या कंपनीचा टाॅवर बसविण्यासाठी पारिजात काॅलनी येथील दतात्रय गायकवाड यांच्या इमारतीवर बसविण्यासाठी त्यानी गायकवाड यांच्या बरोबर करार करुन तो बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सदर दतात्रय गायकवाड यांची इमारत फार जुनी व मोडकळीस आलेली असताना .त्या ठिकाणी महापालिकेने परवानगी कशी काय दिली हा प्रश्न त्या ठिकाणी रहात असलेल्या नागरिकाना पडलेला आहे . पारिजात काॅलनी ,आणि इंदिरानगर झोपडपट्टीतील नागरिकानी तीव्र विरोध केलेला आहे .सदर टाॅवर उभा केल्यानंतर तो कधीही कोलमडू शकतो .कारण  गायकवाड यांच्या इमारतीची अवस्था बिकट असल्यामुळे तो कंपनीचा टाॅवर डासळुन त्या ठिकाणच्या नागरिकाना जिवीतास मुकावे लागणार आहे.व शेजारील घरे सुध्दा भुईसपाट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही . या संदर्भात आज डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे शिष्टमंडळ सतिश लोंढे व शेखर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीचे अप्पर जिल्हाधिकारी याना समक्ष भेटून निवेदन दिले आहे. 

               सतीश लोंढे यांची प्रतिक्रिया
                                        👇



सतिश लोंढे म्हणाले की त्या ठिकाणी टाॅवर उभा केल्यास डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल . तेंव्हा महापालिकेने सदर दतात्रय गायकवाड यांच्या इमारतीवर जिओ कंपनीचा टाॅवर उभा केल्यास स्थानिक नागरिक व गायकवाड यांच्यामध्ये संघर्ष वाद होण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यासाठी प्रशासनाने तात्काळ उभा करण्यात येत असलेल्या टाॅवरचे काम थांबविण्यात यावे .
अन्यथा डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल .


यावेळी निवेदन देताना  सतिश लोंढे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र डि पी आय ,  शेखर मोहिते उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र , 
पोपट मोरे सरचिटणीस सांगली शहर डि पी आय , परशुराम मोहिते व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆