======================================
======================================
सांगली | दि. २९ एप्रिल २०२३
सांगली व इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ पैकी १७ महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली असून भाजपचा पराभव झाला आहे.
आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांची सरशी झाली असून पालकमंत्री सुरेश खाडे व खासदार संजयकाका पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
इस्लामपूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकला असून १८ पैकी १७ जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून एका जागेवर विरोध गटाला समाधान मानावे लागले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆