BANNER

The Janshakti News

शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय रहावेः आ.अरुण (अण्णा) लाड.





=====================================
=====================================

कुंडल | दि. २८ एप्रिल २०२३
-------------------------------------------------------------------        

    शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय राहून समाजकार्यास हातभार लावण्याची गरज असल्याचे मत आमदार अरुण (अण्णा) लाड यांनी व्यक्त केले. ते कुंडल(ता.पलूस) येथील प्रतिनिधी हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षक गोरखनाथ फल्ले यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
        जेष्ठ शिक्षक गोरखनाथ फल्ले हे आपल्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यांचा प्रतिनिधी विद्यासंकुलाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करणेत आला.
 पुढे बोलताना आमदार अरुण लाड म्हणाले की स्वर्गीय क्रांतीअग्रणी डॉ.जी डी बापू लाड यांच्या विचाराने प्रेरित होऊन गोरखनाथ फल्ले यांनी ज्ञानदानाचे आदर्शवत काम केले.शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी काम करावे.शासनाने सर्वसामान्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची भूमिका घेतली असून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे .

यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे ऐतवडेखुर्द चे सरपंच संभाजीराव पाटील म्हणाले की, गोरखनाथ फल्ले यांची शिक्षणाविषयी असणारी तळमळ वाखाण्यासारखी आहे.त्यांचा शांत संयमी स्वभाव नियोजनबद्ध कार्य आदर्शवत आहे.  

यावेळी बोलताना सत्कारमूर्ती गोरखनाथ फल्ले म्हणाले की क्रांतीअग्रणी जी डी बापूंनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीस क्रांती कुटुंबामध्ये काम करण्याची अनमोल संधी दिली.माझ्या आतापर्यंतच्या शैक्षणिक सेवेमध्ये मी प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम केले. आतापर्यंतच्या माझ्या सेवेत मी समाधानी आहे.मला सर्व मंडळींचे चांगले सहकार्य लाभले. क्रांतीचा वारसा लाभलेल्या कुंडल गावांमधून मला खूप शिकता आले. चांगल्या लोकांचा सहवास मिळाला भावी आयुष्यामध्ये ही समाज कार्याची परंपरा  जोपासत राहील.

प्रास्ताविक  मुख्याध्यापक सी. वाय. जाधव यांनी केले
यावेळी गांधी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत रोकडे,खजिनदार गोविंदराव डुबल ,अधिक्षक संभाजी लाड,सहसचिव वसंतराव लाड, संचालक डॉ.व्ही डी पाटील,एम टी हुबाले,सी एस माने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर एस डुबल,शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक एस व्ही पाटील, प्राथमिक विद्यालयाच्या श्रीमती विजया पवार,तसेच सर्व शाखांचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कुंडल(पलूस) येथील प्रतिनिधी हायस्कूल चे जेष्ठ शिक्षक गोरखनाथ फल्ले हे आपल्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाले त्यांचा  विद्यासंकुलाच्या वतीने सपत्निक सत्कार करताना आ.अरुण(अण्णा)लाड, जयश्री पट्टनशेट्टी,ऐतवडेखुर्द चे सरपंच संभाजीराव पाटील,उपाध्यक्ष चंद्रकांत रोकडे आदीसह मान्यवर.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆