BANNER

The Janshakti News

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव हरिपूर कोथळी या पुलास देणेबाबत आमदार मा.सुधिर दादा गाडगीळ यांची शिष्टमंडळाने घेतली भेट .



=====================================
=====================================

सांगली | दि २८ एप्रिल २०२३

हरीपुर - कोथळी पुलास साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नांव देण्यात यावे म्हणून  फुले,शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील कार्यकर्तांनी कार्यसम्राट आमदार सुधिर दादा गाडगीळ यांची घेतली भेट,
यावेळी बोलताना युवा नेते मा. आकाश तिवडे (मेजर)  म्हणाले. 
उपेक्षितांच्या अंतरंगाला साहित्यातून शतरंगी पैलू पाडून मराठी सारस्वतांमध्ये एक नवे दालन खुले करणारा शब्द उद्धार, 
भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करणारा विश्वमित्र, अवघ्या दोन दिवसांची शाळा शिकून स्वतःच्या  वास्तविक साहित्य तत्त्वज्ञानाचे विद्यापीठ निर्माण करणारे जगविख्यात तत्ववेत्ता, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र क्रांतीने पेटवला तो संघर्ष योद्धा,
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास परदेशात सांगणारे पहिले शिवशाहीर,सुलतानकार , 
मातंग समाजाच्या अस्मितेचा पहिला हुंकार म्हणजे फकीराकार, 
अनुसूचित जाती मधील 59 जातीचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या मातंग समाजाचे प्रेरणास्थान महाराष्ट्र भूषण सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव या हरिपूर कोथळी पुलास देण्यात यावे. 




हरिपूर-कोथळी पुलास साहित्यरत्न अण्णाभाऊ देणे म्हणजे समता व सामाजिक न्यायाची नवी ऐतिहासिक परिभाषा आहे.त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात त्यांच्या नावाचे पुल असणे म्हणजे त्यांच्या कार्य कर्तृत्वाची दखल जिल्हाने घेतल्यासारखा आहे,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा गौरव सन्मान हरिपूर- कोथळी या पुलाच्या रूपाने नांव देऊन व्हावा, तसेच स्मारक,पुतळा या संदर्भात मंत्रांची भेट घ्यावी असे तिवडे म्हणाले. 
दलित मित्र मा अशोक पवार सर, प्रा. लक्ष्मण मोरे सर,प्रा.जगन्नाथ मोरे सर,यांनीही महत्वाचा सुचना दिल्या. 



यावेळी बोलताना सुधिर दादा गाडगीळ म्हणाले साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे नांव हरीपुर-कोथळी पुलास दिलेच पाहिजे, आणि त्या अनुषंगाने माझे प्रयत्न चालू आहेत,नुकताच महानगरपालिकेत हरीपुर-कोथळी पुलास साहित्यरत्न सत्यशोधक डाॅ.आण्णा भाऊ साठे यांचे नांव देणे संदर्भात ठराव केला आहे, लवकर हरीपुर ग्रामपंचायत मधे ठराव करून, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना भेटून स्मारक, पुतळा व नामकरणाचा विषय मार्गी लावू अशी ग्वाही दिली. 
स्वागत व प्रस्तावित मा.किरणराज कांबळे यांनी केले तर आभार नगरसेविका मा. अप्सरा ताई वायदंडे यांनी मानले. 


यावेळी नगरसेविका मा. अप्सरा ताई वायदंडे, दलित मित्र मा.अशोक पवार सर, प्रा.लक्ष्मण मोरे सर,प्रा. जगन्नाथ मोरे सर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.कुमार वायदंडे मामा, सामाजिक कार्यकर्ते मा.किरणराज कांबळे (आमदार),सामाजिक कार्यकर्ते मा.गणेश वायदंडे,सामाजिक कार्यकर्ते, मा.अमर मगदूम,सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन केंचे(हरीपुर), मा.रंजित केंचे, सामाजिक कार्यकर्ते मा.विक्रम कांबळे(नांद्रे), सामाजिक कार्यकर्ते मा. मिलिंद कांबळे(नांद्रे), मा.आकाश मद्रासी, मा.जमीर पत्रवट,मा.नागेश माने(धामणी),मा.सुधिर देवकुळे(माधनगर),मा.सचिन आवळे (बूधगांव),मा.शुभम केंचे, मा.इसाक केंचे, मा.हर्षल मोरे, मा.रोहित तांदळे, मा.आदित्य केंचे, मा.सियोन आळतेकर,मा.मारतंड लोंढे, मा.सियोन केंचे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆